Amit Thackeray Pune : विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपूत्र अमित्र ठाकरे (Amit Thackeray) मैदानात उतरणार आहेत. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आलय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 


23 फेब्रुवारीला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात धडकणार मोर्चा


विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. 23 फेब्रुवारी रोजी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चेत सहभागी होणार आहेत. 


 


मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर 


मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज (दि.19) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर युतीच्या चर्चांना जोर धरला आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या भेटी होत असल्याने युतीची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांना महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यासाठी प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. 


राज ठाकरेंनी युतीबाबत बोलणे टाळले 


राज ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या मुद्द्यावर बोलणे टाळले आहे. राज ठाकरे यांनी सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी  भाजपसोबत युतीच्या चर्चांवर मौन बाळगलं असून वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं आहे. मात्र, राज ठाकरे यांनी युतीच्या चर्चा अद्याप तरी फेटाळलेल्या नाहीत. त्यामुळे भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


युतीबाबत शेलार काय म्हणाले?


आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, राजकरणात भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात. अद्याप कोणताही राजकीय निर्णय नाही, योग्य वेळी याबाबत चित्र स्पष्ट होईल, असं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं आहे. 'देवेंद्रजी म्हणाले आहेत तर, लवकरच चित्र स्पष्ट होईल. सध्या मी मनसेबद्दल काहीच बोलणार नाही, योग्य वेळी यावर निर्णय होईल', असं शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Aditya Thackeray : 'राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवा', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान