पुणे: पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा होता. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. शीतल तेजवानीप्रमाणेच पुण्याचे अजित पवार गटाचे उपमहापौर निलेश मगर यांनीही २०१८ मध्ये पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) केली असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर हे ही मोठे प्लेयर आहेत. २००६ मध्ये शितल तेजवानीनं ८९ लोकांची पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) केली, तर २०१८ मध्ये कुळाची जमीन दाखवून १८ लोकांच्या कुळाची पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) निलेश मगर यांनी केली. तर आधीच वतनाच्या असलेल्या जमिनीवर १८ जणांचे असे कुळ दाखवणे नियमबाह्य असल्याचा आरोप अंजली दमानीयांनी केला आहे. माजी उपमहापौर निलेश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर आहेत, खारगे समितीसमोर निलेश मगरांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील अंजली दमानीयांनी केली आहे. 

Continues below advertisement

तर अंजली दमानियांच्या या आरोपांवर अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी निलेश मगर यांनी अंजली दमानिया यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझा या जमीन व्यवहाराशी काहीही संबंध नाही  २०१८ मध्ये कुळ असलेले पासलकर आणि ढमढेरे मदत मागायला आले होते, मात्र त्यात काहीही दिसलं नाही त्यामुळे तो विषय कधीच सोडला. हा व्यवहार २०२५ मध्ये झालेला आहे त्यामुळे माझा संबंध नाही. मी लहान कार्यकर्ता आहे. पण वेळ पडली तर अंजली दमानियांवर कायदेशीर कारवाई करेन. अजित पवारांचा कार्यकर्ता असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याची शक्यता आहे, असंही दमानियांनी म्हटलं आहे.

Pune Mundhwa Land Case :  काय म्हटलंय अंजली दमानियांनी?

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत थेट अजित पवार यांचा या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार यांच्या पक्षाची या जमिनीवर नजर होती, सत्तेमध्ये आल्यानंतर अजित पवारांनी मुलाच्या नावावर जमिनीच्या खरेदीची तयारी केली असाही आरोप त्यांनी केला आहे, अजित पवारांच्या पक्षाचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांच्यावर देखील दमानिया यांनी आरोप केले आहेत, निलेश मगर यांनी 2018 मध्ये जमिनी संदर्भात पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) केली असं देखील त्यांनी म्हटलं आहे, तर निलेश मगर मुंढवा जमीन प्रकरणात मोठे प्लेयर असल्याचेही त्यांनी म्हटले, मगर यांची ही खारगे समितीने चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे, 

Continues below advertisement

अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता, माझ्याकडे जे कागदपत्र आहेत ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजेच पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) ही 2018 साली घेतली होती, निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते, त्यांनी पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) कोणाकडून घेतली होती असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.