Malegaon Sakhar Karkhana Election Result 2025 : माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत 21 जागांपैकी 13 जागांचे निकाल लागले असून त्यामध्ये 12 जागांवर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. स्वतः अजित पवार संस्था प्रवर्गातून निवडून आले आहेत. तर एका जागेवर चंद्रराव तावरे निवडून आले आहेत.
माळेगाव सहकारी साखर काऱखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.
माळेगाव साखर कारखान्यासाठी सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये बुधवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 13 जागांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये सर्व जागांवर अजित पवारांच्या उमेदवारांनी बाजी मारली. तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेल आणि शरद पवार यांच्या बळीराजा पॅनेलचा धुव्वा उडाल्याचं दिसून आलं.
Malegaon Sugar Factory Election Result : निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव 8) राजेंद्र बुरुंगले9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप11) तानाजी कोकरे12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे
(टीप- ही यादी सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या निकालाची असून त्यामध्ये अपडेट्स येत राहतील)