पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरीमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे नेते आणि आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी महानगरपालिका निवडणुकीवेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून अजित पवारांची माफी मागितली. हा दिवस जड अंतकरणाचा आहे. अजितदादा मला माफ करा, अशा शब्दांत महेश लांडगे यांनी माफी मागितली आहे.(Mahesh Landge)
आमदार लांडगे यांनी त्यांची माफी मागितली
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार लांडगे (Mahesh Landge) यांनी त्यांची माफी मागितली आहे. चिंचवड येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय, सामाजिक संघटना, संस्था यांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लांडगे बोलत होते.(Mahesh Landge)
महेश लांडगे देखील अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुद्यावरुन महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते. महानगरपालिकेत भाजपच्या मोठ्या प्रमाणात जागा पिंपरी चिंचवडमध्ये निवडून आल्या. परंतु महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर पंधरा दिवसांतच अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने पिंपरी चिंचवड शहराचा विकास करण्यात मोठा वाटा असलेल्या अजित पवारांच्या जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना महेश लांडगे देखील अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. दादा मला माफ करा, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. (Mahesh Landge)
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असे युद्ध पाहायला मिळाले होते. अजित पवारांवर केलेली टीका आणि एकेरी उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागला होता. तो मोठा नेता आहे, माझा एकेरी उल्लेख करणारच, असे म्हणत अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्या टीकेला उत्तर दिले होते. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर 15 दिवसातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी अजित पवारांचा जुना एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. अजित पवार यांच्या निधनाच्या काही दिवस आधीच त्यांना आपण एकेरी बोललो, याची बोच महेश लांडगे यांना लागून राहिलेली आहे. केवळ 40 सेकंदाच्या भाषणात त्यांनी दादा मला माफ करा म्हणत झालेल्या चुकीची क्षमा मागितली आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुद्यावरुन अजित पवारांवर हल्लाबोल करणारे भाजप आमदार महेश लांडगे काल अजित पवारांच्या आठवणीने भावूक झाले. दादा मला माफ करा, असे म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वहिली.
महेश लांडगेंनी 40 सेकंदात मंच सोडला
आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा दिवस जड अंतकरणानं आलेला आहे. मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा, असं म्हणत महेश लांडगेंनी 40 सेकंदात मंच सोडला.
