शिर्सुफळ, बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात तू तू मै मै सुरुच असल्याचं दिसत आहे. त्यातच आता अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माहेरवाशीण आलेल्या लेकीला साडीचोळी करा मात्र बटन दाबण्याच्या भानगडीत पडू नका, असं अजित पवार म्हणाले आहे. अजित पवार बारामती तालुक्यातील गावात आज सभा घेत आहे. याच सभेच बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. 


अजित पवार म्हणाले की,  मुलगी घरी आल्यानंतर आई काय म्हणते. ये पोरी 10-5 दिवस रहा. नणंद भावजय चांगल्या मिळून-मिसळून रहा. त्यानंतर आईच लेकीला आणि जावयाला पोशाख करुन सासरी पाठवते. मुलगी माहेरची तर असतेच मात्र सासरची लक्ष्मी असते, लेकीला साडी चोळी करा पण बटण दाबण्याच्या भानगडीत पडू नका,  असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा साधला.  


बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे. त्यातच शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा बाहेरचे पवार असा उल्लेख केला होता. त्याला आता शरद पवारांच्याच होम ग्राऊंडवर अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी एखादी मुलगी सून म्हणून घरात येते तेव्हा ती घरची होते. आमच्यात मात्र चाळीस वर्षे झाले तरी ती बाहेरची सून असते. 


सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटल जाते, सून घरात आल्यावर सासू सूनेच्याच हातात चाव्या देते ना, चुकल तर जरुर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत नव्हतच ना, पण संधी मिळाली की करुन दाखवलच ना, तसंच यंदा सुनेला मतदान करा, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे. 


विरोधी पक्षाचा खासदार गेले दहा वर्षे होता मात्र काहीच काम करू शकला नाही अशी अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. त्यासोबतच तुम्ही कोणाच्याही दबावाला दडप जायला घाबरू नका. सात तारखेनंतर तुम्ही आणि मीच आहे. बाकीचे सगळे परदेशात फिरायला जातील. चांगल्या वाईट काळामध्ये आपणच एकमेकांना साथ देणार आहोत



येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 288 आमदार असणार आहेत 96 महिला आमदार देखील निवडून जाणार आहेत. महिलांना जो मानसन्मान मिळवून दिलेला आहे तो मोदी सरकारने दिला आहे आणि इकडे सुनेला अशी वागणूक मिळत आहे. महिलांचा अपमान केला जात आहे, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे निवडणुकीच्या दिवशी कामगारांना सुट्टी जाहीर करावी. सुट्टी दिली तर कामगारांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही. एक एक मत महत्वाचं असल्याचंही अजित पवार म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar : कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा; चुकलात तर गाठ माझ्याशी; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम