पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदीचा व्यवहार (Mudhwa Land Deal) आपल्याला माहिती नव्हता, नाहीतर आपण असं होऊच दिलं नसतं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. अशा जमिनीची खरेदीखत होऊच शकत नाही, तरीदेखील हा व्यवहार कसा झाला हे पाहावं लागेल असंही अजित पवार म्हणाले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती बारकाईने तपास करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंढव्यातील महार वतनातील 1800 हजार कोटी रुपये किमतीची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने फक्त 300 कोटींना खरेदी केली. त्यासाठी असलेला 21 कोटी रुपयांची स्टँप ड्युटीही माफ करण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर विरोधकांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे.

Pune Mudhwa Land Scam : खरेदीखत झालं कसं?

या प्रकरणवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "असे व्यवहार होऊन शासनाचं नुकसान होऊ नये. काहींनी धाडस दाखलं, ते कसं दाखवलं याची चौकशी झाली की सत्य समोर येईल. ज्या व्यवहाराची नोंदणीच करता येत नाही, तो झालाच कसा? या प्रकरणात खरेदीखत होऊ शकत नाही. तरीही हा व्यवहार कसा झाला हे माहिती नाही. या प्रकरणात कुणाचा दबाव होता का हे पाहावं लागेल."

बोपोडीमध्ये आमचा कुणाचाही संबंध नव्हता, पण त्यामध्ये आमच्या कुटुंबीयांचं नाव घेतलं गेलं. मला हा व्यवहार झाल्याची माहिती नव्हती, नाही तर मी असं होऊच दिलं नसतं असं अजित पवार म्हणाले.

Pune Land Deal : तपासातून सत्य समोर येईल

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून याचा तपास करण्यात येत आहे. ही समिती बारकाईने तपास करेल आणि त्यातून सत्य बाहेर येईल असं अजित पवार म्हणाले.

Parth Pawar case : पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?

या प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नोंदवण्यात आला नाही असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की," मी या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य पाहिले. हा व्यवहार होताना रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जे लोक उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास होऊन महिन्याभरात सत्य समोर येईल."

Sheetal Tejwani : शीतल तेजवाणी देश सोडून पळाली?

मुंढवा भागातील सरकारी जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचं नाव यात आल्याने या प्रकरणाला वेगळंच वजन आल्याचं दिसतंय. त्याचवेळी या तापलेल्या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीचा पत्ता लागत नसल्याने, पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. ती देशाबाहेर पळून गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Land Scam : तिघांवर गुन्हा दाखल

पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यवसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी संगणमत करुन शासनाचा 5 कोटी 89 लाख 31 हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी असलेल्या शितल मेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

ही बातमी वाचा: