पुणे: पुण्यात जन्म देणाऱ्या आईला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या आईला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर व्रण ही उमटले आहेत. मारहाण करणाऱ्या पोराचं मारुती देशमुख असं नाव असून नुकतीच त्यांची मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचं विश्वस्त पद ही त्यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली.
नेमकं काय घडलं?
आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. मात्र, आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना काय पचनी पडलं नाही. मग त्या इथून परत पुण्यात लहान भावाकडे जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आईला बेदम मारहाण केली आहे.
याप्रकरणी आईने लोणावळा ग्रामीण पोलिसांत मुलगा मारुती, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात केला आहे. अजित पवार सत्तेत असल्याचा गैरफायदा त्यांचे समर्थक घेत असल्याचं समोर येत असताना त्यात या आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. माझ्या पक्षातील कोणी कायदा हातात घेतला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असा आदेश अजित पवारांनी आधीच दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला आहे, पण तो अदखलपात्र गुन्हा आहे. मुळात ज्या आईने जन्म दिला, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या मारुती देशमुखांना बेड्या ठोकण्याची अन अजित पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची गरज आहे. मात्र पोलीस आणि अजित दादा ही पावलं उचलणार का? हा खरा प्रश्न आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली. आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. मात्र, आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना काय पचनी पडलं नाही. मग त्या इथून परत पुण्यात लहान भावाकडे जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे.