Malegaon Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा करत होते ही बाब पहिल्यांदाच उघड झाली आहे.
Malegaon Sakhar Karkhana Election Result 2025 : विधानसभा निवडणूक झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सातत्याने चर्चा सुरू आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत असल्याचं कारण त्यामागे आहे. आता या संदर्भात अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
माळेगाव सहकारी कारखान्याच्या मतमोजणी अंतिम टप्प्यात असून त्यामध्ये अजित पवारांच्या उमेदवार आघाडीवर आहेत. स्वतः अजित पवारांनी संस्था प्रवर्गातून दमदार विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र धुव्वा उडाल्याचं दिसून येतंय. अशात अजित पवारांनी एक मोठी माहिती उजेडात आणली आहे.
ट्रेंडिंग
शरद पवारांच्या नेत्याकडून दोन-तीन वेळा चर्चा
माळेगाव कारखाना निवडणुकीत एकत्र येण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अॅड. एस एन जगताप यांनी आपल्याशी दोन ते तीन वेळा एकत्रित लढण्याबाबत चर्चा केल्याची माहिती अजित पवारांनी माध्यमांना दिली. मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने मात्र आपल्याशी चर्चा केली नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची चर्चा सुरू असताना ही चर्चा का फिस्कटली, त्यामागे काय कारण होतं यावर वक्तव्य करणं अजित पवारांनी टाळलं.
Malegaon Sugar Factory Result : माळेगावसाठी चार पॅनेल रिंगणात
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.
Ajit Pawar Won : ब वर्ग गटातून अजित पवार विजयी
या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध ठरली. त्यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.
ही बातमी वाचा: