पुणे : राज्यात प्रतिष्ठेची बनवलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर अजित पवारांची निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी संगिता कोकरे यांची निवड करण्यात आली. अजित पवारांच्या निवडीला विरोधी गटाने आक्षेप घेतला. ब वर्गातून निवडून आलेल्या व्यक्तीला चेअरमन पदावर बसता येत नाही अशी तक्रार विरोधकांनी केली. मात्र त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ संपल्याचं कारण देत अजित पवारांची निवड कायम ठेवली. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांची माळेगाव कारखान्याचे चेअरमन म्हणून संचालक मंडळाने निवड केली. तर व्हाईस चेअरमनपदी संगिता कोकारे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावर विरोधकांचे एकमेव निवडून आलेले संचालक चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या निवडीवर आक्षेप घेतला. 

वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्याचं उत्तर

अजित पवारांची नियुक्ती होण्याआधीच चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या नावावरती हरकत घेतली. ब वर्ग गटातील गटातील व्यक्तीला चेअरमन होता येत नाही असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे असे तावरे यांनी सांगितले. तसेच अजित पवारांची नियुक्ती केल्याने चंद्रराव तावरे यांनी नियमाप्रमाणे कामकाज करावं असं म्हणत बैठकीतून काढता पाय घेतला. यावेळी अजित पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचं रंजन तावरे म्हणाले. 

माळेगाव सहकारी कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत 21 पैकी 20 जागांवर यश मिळवलं. तर सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे एक एकमेव उमेदवार निवडून आले. शरद पवार गटाच्या बळीराजा पॅनेलचा मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही. 

अजित पवारांचा विजय हा जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय असल्याची टीका सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी केली. विरोधी गटाने त्यांना चांगलंच झुंजवलं आणि एक संचालकही निवडून आणल्याने पूर्ण बहुमताने हा कारखाना जिंकण्याचं अजित पवारांचे स्वप्न पूर्ण झालं नसल्याचंही रंजन तावरे म्हणाले. रंजन तावरे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

Malegaon Sugar Factory Winning Candidate List :  निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार

ब वर्ग

1) अजित पवार 

भटक्या विमुक्त राखीव 

2) श्री विलास देवकाते 

अनुसूचित जाती राखीव

3) रतन कुमार भोसले 

इतर मागासवर्ग राखीव

4) नितीन कुमार शेंडे

महिला राखीव

5) सौ संगीता कोक6) सौ ज्योती मुलमुले

माळेगाव गट : 01

7) शिवराज जाधवराव 8) राजेंद्र बुरुंगले9) बाळासाहेब तावरे

पणदारे गट : 2

10) योगेश जगताप11) तानाजी कोकरे12) स्वप्नील जगताप

सांगवी गट : 01

13) चंद्रराव तावरे14) गणपत खलाटे15) विजय तावरे

शिरवली गट 

16) प्रताप आटोळे17) सतिश फाळके

बारामती गट

18) नितीन सातव19) देविदास गावडे

नीरावागज गट

20) जयपाल देवकाते21) अविनाश देवकाते