मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यावर शोककळा पसरल्याचं चित्र आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांचा विमान अपघातात मृत्यू(Ajit Pawar Plane Crash) झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा विमान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे.
फॉरेन्सिक टीमच्या हाती अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात नेमका कसा आणि का झाला याची माहिती मिळणार आहे. या विमान अपघातामध्ये सर्वजण म्हणजे, पाचही जण मृत्यूमुखी पडल्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या अपघाताचा तपास करता येणं शक्य आहे.
Black Box : ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?
प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात
1. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR)
- हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालींची नोंद ठेवतं, जसं की,
- विमानाची गती (Speed)
- उंची (Altitude)
- इंजिनची स्थिती
- पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स
- ऑटो-पायलट चालू/बंद स्थिती
अपघाताच्या काही सेकंदांआधी विमानामध्ये नेमकं काय झालं याचा अचूक डेटा यात साठवलेला असतो.
2. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)
- हा भाग पायलटांच्या कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो, त्यामध्ये
- पायलट आणि सह-पायलट यांच्यातील संभाषण
- एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा (ATC) संवाद
- अलार्म्स, चेतावणीचे आवाज
- अपघाताआधीची गडबड, तणाव किंवा गोंधळ
- ही माहिती अपघाताच्या मानवी चुकांची (Human Error) शक्यता तपासायला फार महत्त्वाची ठरते.
अपघातानंतर ब्लॅक बॉक्स का शोधला जातो?
ब्लॅक बॉक्सचा वापर अपघाताचं मूळ कारण शोधण्यासाठी होतं. विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? पायलटची चूक होती का? हवामान कारणीभूत होतं का? एखादा सिस्टीम फेल झाला का? या सर्वांची उत्तरं ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून मिळतात.
Ajit Pawar Plane Crash Timeline : विमान अपघाताचा घटनाक्रम
- पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
- बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.
- त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
- विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
- याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
- धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
- दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
- याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.
- DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
- लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
- सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
- रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
- विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
- त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
- आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
- अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
ही बातमी वाचा:
