Tanisha Bhise Death Case : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय, चौकशी समिती करण्याचे आदेश; रुग्णालयांना दिल्या कडक सूचना
Tanisha Bhise Death Case : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालय तर्फे चौकशी समिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्तालयातर्फे राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या गर्भवतीचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राज्यातील सगळ्यात धर्मादाय रुग्णालयांना नियम आणि अटी पाळण्याच्या सूचना दिली आहे आणि नियमांची अंमलबजावणी देखील करण्याच्या सूचना दिली आहे. तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शंभर दिवसांच्या सरकारचा आढावा घेताय तर दुसरीकडे जुन्याच नियमांखाली राज्यातली धर्मादाय रुग्णालय सुरू आहेत, यावर फेर विचार करावा, अशी मागणी धर्मादाय आयुक्तालयाकडून होत आहे.
धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी निर्देश
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालय तर्फे चौकशी समिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्तालयातर्फे राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेला धर्मदाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयाकडून प्रभावी अंमलबजावणी करा, धर्मादाय आयुक्तालयाच्या राज्यातल्या सगळ्या रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खटा निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपलब्ध करून द्या अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
कोणत्या आहेत महत्त्वाच्या सूचना?
विधी व न्याय विभागामार्फत गठित करण्यात आलेल्या तपासणी आणि पथकामार्फत तपासणी अहवाल आणि समितीच्या शिफारसी सादर केले आहेत त्या शिफारशींवर तात्काळ कारवाई करावी.
शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 दरवाजे आरोग्य सेवकांचा मान्यता देण्यात आली आहे ही सगळी पदं तात्काळ भरावी.
निर्धन रुग्णनिधी खात्याबाबतची अध्यायवत माहिती धर्मादाय रुग्णालयाकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर देण्यात यावी.
योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालयांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.
परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.
























