पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला (Fuel Saving Appeal) प्रतिसाद देण्यासाठी मुख्यमंत्र्यानंतर आता पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आजचं कामकाम सायकलवर करत आहेत. पण केवळ एक दिवस सायकल प्रवास करुन भागणार नाही, त्यामुळं आठवड्यातून एक दिवस सायकलवरून (Fuel Saving Appeal) कामकाज करण्याचा निर्धार केला आहे. मी पदावर आहेत तोपर्यंत याचं अनुकरण करेल, असं महापौर म्हणालेत. सोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत शेअरिंग सायकलची बारगळेलेली योजना नव्यानं सुरु करणार असल्याचं आणि प्रत्येक रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारणार असल्याचं ते म्हणालेत.(Fuel Saving Appeal)

Fuel Saving Appeal :  राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक थेट बैलगाडीने पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल झाले आहेत. आजच्या सर्व साधारण सभेला हजेरी लावताना पंतप्रधानांच्या आवाहनाला त्यांनी असा प्रतिसाद दिला आहे. मात्र महायुतीतील भाजप पालिकेत उधळपट्टी करुन पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासत आहेत, अशी टीका या नगरसेवकांनी केली आहे.

Fuel Saving Appeal :  पिंपरीच्या महापौरांकडून परदेश दौरा रद्द

पिंपरी चिंचवडचे अखेर महापौर रवी लांडगेंनी परदेश दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साथ देत, देशहितासाठी हा अभ्यास दौरा रद्द करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सोबतचं आठवड्यातून एक दिवस सायकल वर प्रवास करणार, पालिका अधिकाऱ्यांना प्रति महिना पन्नास हजार रुपयांचा इंधन भत्ता देण्याचा प्रस्ताव फेटाळणार आणि नव्यानं खरेदी केली जाणारी वाहनं इलेक्ट्रिक खरेदी करणार असल्याचं लांडगेंनी स्पष्ट केलं.

Fuel Saving Appeal : मोदींच्या आवाहनानंतर सरकारकडून काटकसरीवर भर

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला आणि डिजिटल बैठका घेण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्य सचिवांच्या परिपत्रकानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Fuel Saving Appeal : नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? 

  1. सोन्याची खरेदी टाळा
  2. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा 
  3. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
  4. परदेश प्रवास टाळा
  5. खाद्यतेलाचा वापर कमी करा
  6. नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
  7. स्वदेशी उत्पादनं वापरा