एक्स्प्लोर

Rohit Pawar: अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका...', मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक झाल्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं आता पुढं काय?

Rohit Pawar: पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

मुंबई:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपन्या, अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे आक्रमक झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतके पुरावे आहेत सगळे न्यूजमध्ये सगळं आलेलं आहे, कारवाई का केली जात नाही, पोलीस ठाण्यामध्ये हे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर रोहित पवार यांना मरीनड्राईव्ह पोलिसांनी एक पत्र दिल आहे. या पत्रात पोलिसांनी आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून कारयदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे, त्यानंतर आता रोहित पवारांनी आपल्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त करत उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Rohit Pawar : पोस्टमध्ये रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय?

आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन BNS कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार माझा जबाब घेण्यास सुरवातही झाली होती, परंतु त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा FIR दाखल करुन घेण्यास नकार देत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्ज घेतला".

"पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मागणी करुनही पोलिसांकडून FIR दाखल करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यामुळं सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचं स्पष्ट दिसत असून हे असंच सुरु राहिलं तर अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका निर्माण होत आहे, परंतु आम्ही मात्र हा विषय तडीस नेल्यावाचून थांबणार नाही. उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार आहे", अशी माहिती देखील रोहित पवारांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमधून दिली आहे.

Rohit Pawar : बारामतीत जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करू

आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलो. यावेळी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढेही पोलीस स्थानकात होते. यावेळी थोडी वादावादी झाली. यावेळी आमच्या वकिलांनी समजावून सांगितलं. दरम्यान, माझा बयाण टाईप करत असताना मोठे अधिकारी आलेत आणि त्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. दुर्दैव आहे जर आम्हाला आमचा अधिक वापरत येत असेल तर आम्ही करायचं काय? सत्तेतील नेते या बाबतीत काय निर्णय घेतात हे हि आम्ही बघू. मात्र उद्या आम्ही बारामतीत जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करू असेही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget