पुणे: पिंपरी चिंचवडमधील मागासवर्गीय वस्तीगृहात पिझ्झाचा बॉक्स सापडला. ज्या खोली बाहेर हा बॉक्स सापडला, त्या खोलीतील विद्यार्थिनींवर कारवाईचा बडगा उगरण्यात आलाय. खोलीतील चार विद्यार्थिनींना पुढचा एक महिना येण्यास मनाई करण्यात आलीये. तशा आशयाची नोटीस सध्या व्हायरल झाली असून समाज माध्यमांत या कारवाईला घेऊन संताप व्यक्त केला जातोय.
याबाबत वस्तीगृहाच्या मुख्य मीनाक्षी नरहरी यांच्याशी संपर्क साधला, तेंव्हा केवळ नोटीस दिली आहे, एक महिन्याची कोणतीही मनाई करण्यात आली नाही. असा खुलासा त्यांनी केलाय. वस्तीगृहात तीन वेळचे जेवण दिलं जातं. अगदी घरुन सुद्धा त्यांना वेगवेगळे पदार्थ वस्तीगृहात आणण्याची मुभा आहे. मात्र हॉटेलमधील पदार्थाने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळं वस्तीगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ मागवण्याची बंदी आहे.
असं असताना 31 जानेवारीला पिझ्झाचा बॉक्स वस्तीगृहातील खोलीबाहेर आढळला. यावरुन त्या खोलीतील एकीने हा पिझ्झा ऑर्डर केला असेल हा कयास बांधण्यात आला. चौघींना याबाबत विचारलं असता एकीने ही पिझ्झा ऑर्डर केल्याचं मान्य केलं नाही. त्यामुळं 6 फेब्रुवारीला चौघींपैकी एकीने याची कबुली दिली नाही तर 8 फेब्रुवारीपासून एक महिना वस्तीगृहात येण्यास मनाई करण्यात येईल. असं या नोटीसमध्ये नमूद आहे.
हिचं नोटिस सध्या व्हायरल झाली असून त्यावरून समाज माध्यमात संताप व्यक्त केला जातोय. या कारवाई बाबत वस्तीगृहाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता विद्यार्थिनींनी नियमांचे पालन करावे, म्हणून केवळ नोटीस धाडली होती. मात्र इतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा खुलासा वस्तीगृहाच्या मुख्य मीनाक्षी नरहरे यांनी खुलासा केला.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI