पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून (Pune Crime News) झालेल्या हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.  शंतनू लक्ष्मण जाधव असं या 21 वर्षीय आरोपीचं नाव होतं. सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने तरुणीवर पळत जात हल्ला करण्याता प्रयत्न केला होता. मात्र लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान दाखवल्याने या  तरुणीवरचा हुकला होता. 


जाधवने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड. स्वप्नील चव्हाण, ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. 


बचाव करणारा लेशपाल म्हणतो...


'या तरुणाला जामीन मंजून झाल्याचं समजलं. आपल्या देशात कायदा प्रबळ आहे. त्यामुळे कायद्यानुसार सगळी प्रक्रिया पार पडत आहे. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एका निरापराधाला शिक्षा नको व्हायला, असा अलिखित नियम आपल्या देशात पाळला जातो. त्यामुळे प्रकरणीदेखील योग्य कारवाई होईल आणि शिक्षा दिली जाईल, अशी खात्री आहे. भविष्यात हाच मुलगा महिलांच्या सुरक्षेसाठी त्याचं आयुष्य समर्पित करेल, अशी अपेक्षा बाळगतो', असं या तरुणीला वाचवणारा तरुण लेशपाल जवळगे सांगतो. 


सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार 


जून महिन्यात पुण्यात भररस्त्यात हल्ल्याचा थरार पाहायला मिळाला होता.  27 जून 2023 रोजी सदाशिव पेठेत सकाळी दहाच्या सुमारास तरुणीवर कोयत्याने वार केले होते. त्यामुळे मोठी खबळब उडाली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. राजकारण्यापासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी संताप व्यक्त केला होता. मात्र एका तरुणाच्या प्रसंगावधानाने ही तरुणी थोडक्यात बचावली.  त्यावेळी काही तरुणांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पीडित 20 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव कोठडीत होता.


नकार दिल्याच्या रागातून हल्ला


प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून ही सगळी घटना घडली होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हापासून हा तरुण या तरुणीच्या प्रेमात होता. त्यानंतर तरुणीने प्रेमाला नकार दिला  होता. याचा त्याला राग आला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनीदेखील तरुणाच्या घरी हा प्रकार सांगितला होता. तरुणाच्या आईने त्याला समजावलंदेखील होतं. मात्र घरापर्यंत माहिती गेल्यानं त्याचा राग अनावर झाला आहे. त्याने थेट तरुणी कॉलेजला जात असताना तिच्यावर हल्ला केला होता. 


 


इतर महत्वाची बातमी-


Sasoon Hospital Drug Racket Pune : आधी पोटाचा विकार झाल्याचा बनाव, नंतर वेगवेगळ्या आजाराची कारणं अन् पोलिसांच्या हातावर दिली तुरी , ससूनमध्ये ललितला आश्रय कोण देत होतं?