Baramati Student Murder : विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार होत असतानाच कोयता गँगची सुद्धा दहशत माजली आहे. पुण्यातून आता बारामतीमध्ये सुद्धा त्याचं लोणं पसरलं आहे. आज (30 सप्टेंबर) बारामतीमध्ये दिवसाढवळ्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्याच्या (Baramati Student Murder) झालेल्या खुनाने बारामती हादरून गेली आहे. बारामतीमधील प्रसिद्ध अशा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement


भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत


दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने हा खून केल्याची माहिती समोर येत आहे. या दोन विद्यार्थ्यामध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं आणि भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे.हल्ला करण्यात आला तेव्हा दोघेजण होते. यामधील एक जण पळून गेला असून एक जण पोलिसांना सापडला. दरम्यान, हा खून चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच झाला. 


कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही


दिवसाढवळ्या खून होत असताना तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये वर्दळ असताना सुद्धा विद्यार्थ्याच्या मदतीला कोणी सुद्धा धावून आलं नाही. त्यामुळे माणुसकीच हरवून गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला अनेक विद्यार्थ्यांची, शिक्षकांची तसेच सुरक्षारक्षक सुद्धा देखील ये जा असते. मात्र, त्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत असताना त्यामध्ये कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. 


त्यामुळे पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता बारामतीमध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगने प्रचंड अशी दहशत माजवली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असला, तरी कोयता गँगला कोणताही पायबंद बसलेला नाही. आता हेच कोयते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार


दरम्यान, पुण्यामध्येच शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लिहलेल्या पत्रामध्ये पिडीत मुलगी त्याच महाविलयातील प्राध्यापकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापकाने याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या