Pune Omicron Outbreak : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन या व्हेरियंटचे सात रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. तर पुण्यातील एका  रुग्णाचा समावेश आहे. रविवारी पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळलेल्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या नऊ झाली आहे. शनिवारी डोंबविलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता. पुण्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत, त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या नवा व्हेरियंटने पुण्यात शिरकाव केल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत पडली आहे. पुण्यातील निर्बंध वाढणार का? याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.


एकाच कुटुंबातील सहा रुग्ण –
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.


पुण्यातील व्यक्तीला ओमायक्रॉन –
पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता.  29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता. या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. प्रकृती स्थिर आहे.





पुण्यातील रविवारी आढळले 161 नवे रुग्ण –
पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. अशातच पुण्यात रविवारी 161 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये पुणे शहरात 81, पिंपरीमध्ये 39 तर ग्रामिण भागात 31 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय कंटामेंट आणि कौन्सिलमध्ये 10 रुग्ण आढळले आहेत. रविवारी पुण्यात दोन जणांचा मृत्यू झालाय.


परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह!
पुणे शहरात 4387 नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.