पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेला आणि नारवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचे जीवंत स्मारक असलेल्या किल्ले सिंहगडावर एक दुर्दैवी प्रकार घडला. शिवरायांच्या पवित्र गडावर परदेशातून आलेल्या तरुणाला लाज आणणारं कृत्य करायला लावण्यात आलं. यात पुण्यातील (Pune) टवाळखोरांनी कॅनडामधून आलेल्या काही पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर शिव्या द्यायला शिकवले होतं. भाषेच्या अज्ञानामुळे आपण शिव्या देतोय याची पुसटशी शंका ही या विदेशी पर्यटकाला आली नाही. मात्र हा व्हिडिओ वायरल (Sinhgad Tourist Video Viral) झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला आणि सर्वत्र संतापाची एकच लाट पसरली. 

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर या टवाळक्यांनी शिव्या द्यायला शिकवल्या होत्या. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकारणी गुन्हा नोंदवून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. 

शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, इतिहासाची, गड-किल्ल्याची भुरळ आजही अनेकांना पडल्या शिवाय राहत नाही. कारण महाराजांनी त्यांच्या हयातीत केलेलं असामान्य कार्य आजही तमाम भारतीयांसहित जगाला प्रेरणा देत आहे. अशातच महाराजांच्या गड किल्ल्याचे, पराक्रमाचे कौशल्य पाहण्यासाठी सिंहगडावर काही परदेशी तरुण आले होते. या तरुणाला पुण्यातल्या काही तरुणांच्या टोळक्याने शिवीगाळ करायला लावत मराठी अस्मितेला कलंक लावण्याचा काम केलंय. त्यानंतर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आपल्या देशाचा सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या? असा संताप या  व्हिडिओवर व्यक्त केला जातोय. (Sinhgad Tourist Video Viral) दरम्यान, या व्हिडिओतील प्रकार पाहून कुणाचेही डोकं संतांपेल असेच हे कृत्य होतं. दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत पुण्यातील टवाळखोरांवर गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. 

राज्यभरातील शिवभक्तांकडून रोष व्यक्त

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला शिव्या शिकवल्याने आपल्या संस्कृतीला डाग लागल्याची भावना शिवभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या देशात, महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकाला शिवीगाळ शिकवणाऱ्या टोळक्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही होत आहे.  अनेकदा परदेशी पर्यटकांशी होणारा स्थानिकांचा व्यवहार फारसा बरा नसल्याचा अनुभव अनेक पर्यटकही कायम व्यक्त करतात. सिंहगडावरील या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या