एक्स्प्लोर

Pune News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारपासून पाणी कपात लागू: अनेक भाग प्रभावित, महापालिकेचा मोठा निर्णय

Pune Water Crisis : पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागात अखेर पाणी कपात (Water Crisis) लागू करण्यात आली आहे.

Pune Water Crisis पुणे: पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागात अखेर पाणी कपात  (Water Crisis) लागू करण्यात आली आहे. शहरात पाण्याची मागणी 25 टक्के पेक्षा अधिक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. यात कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. दरम्यान, या परिसराला महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. उपलब्ध पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होत असून सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. निर्णयाची अंमलबजावणी सोमवार 5 मे पासून करण्यात येणार असून  रोटेशन पद्धतीने हे पाणी दिले जाणार असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.  

उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि  नदीला पडलेला जलपर्णीचा विळखा यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत होती .महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मशिनरीच्या साहाय्याने हे काम हाती घेतले आहे. सांडपाणी रोखण्यासाठी देखील उपयोजना सुरू केल्या आहेत . त्या पाठोपाठ प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीच्या विविध भागातील 70 ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. या पाण्याची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत केली जाणार असून उल्हास नदीतील पाणी प्रदूषित किंवा पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे दोन आठवड्यानंतर स्पष्ट होऊ शकणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी सांगितले. 

जवळपास 70 ठिकाणचे घेतले नमुने

उल्हास नदी जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नदीत बदलापूर पासून कल्याणपर्यंत ठीकठिकाणी नाल्यातील घरगुती आणि रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाण्याची पातळी दूषित झाली आहे. सांडपाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीने नदीपात्रावर आच्छादन धरल्याने नदीतील पाण्याच्या शुद्धतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  नदी वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मी कल्याणकर संस्थेच्या वतीने देखील नदीतील पाण्याची शुद्धता तपासण्याची मागणी करण्यात आली होती .यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्याबरोबरच नदीपात्रातील विविध ठिकाणचे 17 नमुने कल्याण प्रदूषण मंडळ एक यांच्याकडून तर उर्वरित नमुने प्रादेशिक कार्यालय दोन यांच्याकडून घेण्यात आले आहेत. जवळपास 70 ठिकाणचे नमुने घेण्यात आले असून हे सर्व पाणी परीक्षणासाठी प्रयोगशाळेत धाडण्यात आले आहे. या पाण्यात किती प्रकारचे प्रदूषित घटक किती प्रमाणात आहेत याचा उलगडा अहवालानंतर होणार असून हा अहवाल मिळण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे यामुळेच दोन आठवड्यानंतर आपण पीत असलेले पाणी किती प्रदूषित आहे हे नागरिकांसमोर येणार आहे. दरम्यान पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी धाडण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरात लवकर मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे ही वाचा 

 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Death News LIVE Updates: सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
Asha Bhosle Death News LIVE Updates: सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
Asha Bhosle Last Post: 'तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल...'; निधनानंतर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची अखेरची 'ती' पोस्ट VIRAL
'तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल...'; निधनानंतर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची अखेरची 'ती' पोस्ट VIRAL
Weekly Horoscope:  तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचं नशीब पालटलं! एप्रिलचा नवा आठवडा, 3 राशींसाठी कुबेराचे दरवाजे उघडले, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचं नशीब पालटलं! एप्रिलचा नवा आठवडा, 3 राशींसाठी कुबेराचे दरवाजे उघडले, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
Embed widget