Pune: पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांनी केलेल्या कथित गोळीबार प्रकरणानंतर दोन परवानाधारक पिस्तुलांचे परवाने रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परवानाधारी शस्त्राचा गैरवापर झाला आणि त्यामुळे इतरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला, हा निर्णय घेण्यामागील प्रमुख आधार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Pune Crime)

Continues below advertisement


पुण्यात सध्या गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, टोळीयुद्धातून समोर येणारी प्रकरणे, वारंवार समोर येत असून गोळीबार प्रकरणेही समाजमनात भीती निर्माण करत आहेत. 


गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल 


अंबिका कला केंद्र, चौफुला (यवतजवळ) येथे 21 जुलैच्या रात्री घडलेल्या या प्रकरणाने मोठे वादळ उठले होते. या ठिकाणी बाळासाहेब मांडेकर यांनी गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर लगेचच यवत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परवानाधारी शस्त्राचा वापर अशा प्रकारे करणे हे कायद्याने पूर्णपणे निषिद्ध आहे आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते.


पोलिसांचा कठोर निर्णय


अंबिका कला केंद्रात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी 21 जुलै च्या रात्री गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तूलातून हवेत गोळीबार केला होता.याच गुन्ह्यातील पुरावे आणि परिस्थिती लक्षात घेऊन परवानाधारी शस्त्राचा गैरवापर झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी गणपत जगताप यांच्या आर्म लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना पाठवला होता. प्रस्तावाचे सर्व पैलू तपासल्यानंतर आयुक्तालयाने अखेर दोन्ही परवानाधारी पिस्तुलांचे परवाने रद्द केले असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी संबंधित सर्व बाजूंची सखोल चौकशी सुरू ठेवली आहे. 


पुण्यातील कोंढवा परिसरातील गणेश काळे (Ganesh Kale Murder) या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून (Andekar Komkar Gang War) गणेश काळेची हत्या झाली असल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आहे.