पुणे लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रकने पाच वाहनांना धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एका बाप - लेकीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री हा अपघात झाला असून या अपघामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. तसेच वाहतूक ही उशिरापर्यंत सुरळीत केलीय.
ट्रकने पाच वाहनांना अक्षरक्ष: चिरडलं; बाप - लेकीचा दुर्दैवी अंत
पुढे आलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने हा ट्रक निघाला होता. तेंव्हा ट्रकचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यावेळी पहिली धडक समोरच्या चारचाकीला बसली, तर नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या म्हणजे पुण्याला निघालेल्या दोन वाहनांना ही ट्रकची ठोकर बसली. बोरघाटातील वाघजाई मंदिराजवळ रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर चालकाने ट्रक डोंगराच्या दिशेने घेतला अन सुदैवाने ट्रक थांबविण्यात यश आलं. त्यामुळं पुढील दुर्घटना टळली असली तरी यात एका बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ट्रक चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्या अटकेनंतर या अपघाता मागचे सत्य कळू शकणार आहे. सध्या पोलीस त्यादिशेने तपास करत आहे.
पुण्यातील तरुणीला झिपलाईन साहसी खेळ भोवला; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
झिप लाईन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अपघात होऊन त्यात तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. झिपलाईन साहसी खेळ खेळत असताना 30 फूट उंचीवर गेली आणि त्यावेळी स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला. दरम्यान ती थेट 30 फूट उंचीवरून खाली पडली. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
