Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी सांभाळली आहे. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2024 च्या संक्रांतीला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'हनुमान' कधी होणार रिलीज?
12 जानेवारी 2024 रोजी 'हनुमान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भगवान हनुमानापासून प्रेरित असलेला हा भारतीय सुपरहिरो-थीम असलेल्या या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'हनुमान' सिनेमाच्या व्हीएफएक्सचं काम अजून बाकी आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'हनुमान'
तेजा सज्जासह 'हनुमान' या सिनेमात मृता अय्यर, वरलक्ष्मी सार्थकुमार, विनय राय आणि वेनेला किशोर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जवळपास 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रत्येक भाषेत डबिंग व्हायलाही बराच वेळ लागेल. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हनुमान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा देखील प्रशांत यांनी लिहिली आहे. तेलुगू, हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, स्पॅनिश, कोरियन, चिनी आणि जपानी अशा 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रशांत वर्मा यांनी ट्वीट केलं आहे,"गेली दोन वर्ष मी या सिनेमावर काम करत असून आणखी सहा महिने मी काम करणार आहे".
संबंधित बातम्या