Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: भाजपचे सर्वाधिक 225 सदस्य, तर त्या खालोखाल राष्ट्रवादीची बाजी; जिल्हा परिषदेचं मैदान कुणी किती जागांनी मारलं?
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहेत. सध्याच्या कलांनुसार, भाजप आघाडीवर आहे.
LIVE

Background
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: राज्यभरातील 12 जिल्हा परिषद (Zilla Parishad Election 2026) आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा (Panchayat Samiti Election 2026) निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी दहा वाजता सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. अनेक ठिकाणचे निकालही हाती आले आहेत. सध्याच्या कलांनुसार, राज्यभरात भाजप आघाडीवर आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही जोरदार मुसंडी घेतली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकींचं बिगुल वाजलं, त्यानंतर मतदान पार पडलं आणि आज निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
Maharashtra ZP Election Result : जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले?
जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले?

Maharashtra ZP Election : भाजपचे सर्वाधिक 225 सदस्य, तर त्या खालोखाल राष्ट्रवादीची बाजी
राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. भाजपचे एकूण 225 सदस्य निवडून आले आहेत तर त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 172 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 162 तर काँग्रेसचे 55 सदस्य निवडून आले आहेत.
























