Yogesh Kadam on Sunil Tatkare: कोकणातील महायुतीतील (Mahayuti) दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत धुसफूस आता टोकाच्या वळणावर पोहोचली आहे. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद अधिकच चिघळला असून, आता रामदास कदम यांचे सुपुत्र आणि मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी तटकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. "तटकरे यांच्या वक्तव्यानंतर कुठेही कॉम्प्रमाईज साठी जागा राहिली नाही, आता हे मिटेल असं मला वाटत नाही," असा स्पष्ट इशारा देत योगेश कदमांनी महायुतीतील संघर्षाची धार अधिक तीव्र केली आहे.

Continues below advertisement

Yogesh Kadam on Sunil Tatkare: नेमकं काय म्हणाले योगेश कदम?

तटकरे यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेनंतर योगेश कदम चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. योगेश कदम म्हणाले, "सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर कुठेही कॉम्प्रमाईजसाठी जागा राहिली नाही. आता हे मिटेल असं मला वाटत नाही. मी त्यांच्यावर तिखट बोलू शकतो. त्यांच्याबद्दल तिखट बोलणं म्हणजे सत्य बोलणं. पण मला खोलात पडायचं नाही."  याचवेळी त्यांनी मागील निवडणुकांचा उल्लेख करत सूचक विधान केले. "मागच्या विधानसभेला आणि लोकसभेला कोणी कोणाला मदत केली हे समोर आलं तर पितळ उघडे पडेल," असे योगेश कदम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sunil Tatkare vs Ramdas Kadam: नेमका वाद काय?

यापूर्वी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर अत्यंत जहरी शब्दांत टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीदरम्यान प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) उपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "सुनील तटकरे जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे."

Continues below advertisement

या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनीही रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो अशी टीका तटकरेंनी रामदास कदम यांच्यावर केली. एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे असे म्हणत सुनील तटकरे यांच्या कडून कदम यांना मनोरुग्णाची उपमा दिली आहे. आधीच मर्कट त्यात दारु प्यायले असे म्हणत तटकरे यांच्याकडून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर पलटवार करण्यात आला. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल; नेमकं कारण काय?