एक्स्प्लोर

Rupali Patil Thombare: रूपाली पाटील ठोंबरेंच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून महिलेस अमानुष मारहाण; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेमका वाद काय?

Rupali Patil Thombare: मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं दिसून येत आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी गुंड पाठवून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला आहे, याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं दिसून येत आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. मारहाण झालेल्या माधवी खंडाळकर यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. (Rupali Patil Thombare) 

Video Viral: व्हिडीओमध्ये महिलेने काय म्हटलंय?

रूपाली पाटील आणि तिची बहीण, मावशी, मैत्रीण कोण ती मला माहिती नाही आणि तिचा भाऊ सगळेजण इथे मला मारहाण करत आहेत. माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केली, केवळ मी काल एक पोस्ट केली होती, माझं वैयक्तिक मत लोकशाही म्हणून मांडलं होतं. त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, हे सगळ रूपाली पाटील यांनी केलेलं आहे. त्यांची बहीण प्रिया पाटील या सगळ्यांनी मिळून हे सर्व कारस्थान केलं आहे सर्वांनी याची दखल घ्या, असेही मारहाण झालेल्या महिलेने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NCPSP Unofficial Social Media (@ncpsp_99)

Rupali Patil Thombare: मी बीड वरून पुण्याला येत आहे 

तर राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता मात्र त्या त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यासंदर्भात मी बीड वरून पुण्याला येत आहे असं रूपाली ठोंबरे यांनी सांगितलं आहे. कदाचित माझ्या आत्म्याने त्यांना मारहाण केली असेल असं रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे. मारहाणीच्या आरोपावर रूपाली ठोंबरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, मात्र यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. 

Rupali Patil Thombare: रूपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्टीकरणात म्हटलं....

तर रूपाली ठोंबरे पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, मी बीडमध्ये आहे. बीडमधून मी आता पुण्याला येत आहे. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदडलं असेल, घरातल्या कोणी का मारलेलं आहे? काय वाद झाला आहे? या सगळ्याचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. याबाबत इतकंच कळलं आहे की, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार देत आहेत. काय तक्रार देत आहेत? कशाबाबत तक्रार देत आहेत? काय झालेलं आहे? याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेन, सगळ्या माध्यमांना संपूर्ण महाराष्ट्राला मी माहिती घेऊन सांगेन. 

इथे कोणाचा काय वाद झाला आहे? कोण गंभीर आहेत? खंडाळकर कोण आहेत? माझ्या घरचे कोण आहेत? काय वाद झाला आहे? त्याची माहिती मी घेईन, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. एकमेकांविरोधात तक्रार देत आहेत, कोणाची चूक आहे ते समोर येईल, हा खुलासा फक्त मी बाहेर आहे बीडमध्ये आहे त्यामुळे देत आहे, असेही रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.

NCP Sharad Pawar Post: राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली पोस्ट

राष्ट्रवादी शरद पवार गटाने या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, व्हिडीओसोबत लिहलं आहे की, रूपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून सदरील महिलेस (माधवी खंडाळकर) रुपाली ताई समर्थकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्येज्यामध्ये अजित दादांच लैच अवघड झालंय.या ठिकानी एका रूपाली ताईंना आवरायला जावं तर त्याठिकाणी दुसरी रूपाली ताई कांड करून ठेवायल्यात..! सार्वजनिक जीवनात काम करत असताना राजकीय जीवनात काम करत असताना दादांनी किती तो त्रास सहन करायचा म्हणावं त्याठिकाणी..!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
Rohit Pawar and Amol Mitkari: रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांविषयी खालच्या पातळीवर ऑडिओ'; अमोल मिटकरींचा थेट इशारा; म्हणाले, 'तो कितीही मोठा असला तरी...'
रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांविषयी खालच्या पातळीवर ऑडिओ'; अमोल मिटकरींचा थेट इशारा; म्हणाले, 'तो कितीही मोठा असला तरी...'
BMC News मोठी बातमी: मुंबईतील तब्बल 79 नगरसेवकांवर टांगती तलवार; निवडीविरोधात कोर्टात याचिका, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी: मुंबईतील तब्बल 79 नगरसेवकांवर टांगती तलवार; निवडीविरोधात कोर्टात याचिका, नेमकं प्रकरण काय?
Pratap Sarnaik : मोठी बातमी: डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
Pratap Sarnaik : मोठी बातमी: डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Embed widget