मुंबई : राज्यात एकीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, अशातच लाडकी बहीण योजनेंतर्गत (Ladki Bahin Yojana) डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली होती, याबाबत काँग्रेसने केलेल्या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आज (सोमवारी) सकाळी ११:०० पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(Ladki Bahin Yojana)

Continues below advertisement

लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याच्या काँग्रेसचा दावा आहे. या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी ११ पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ असे २ महिन्यांचे ३ हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार १४ जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एकप्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे, तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारकला खुलासा करण्याचे आदेश दिलेत.(Ladki Bahin Yojana)

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ असे २ महिन्यांचे ३ हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार १४ जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एकप्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे, तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

Continues below advertisement

सकाळी ११ पर्यंत उत्तर द्या

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाने मुख्य सचिव राजेशकुमार यांना रविवारी एक पत्र पाठवून याबाबतची वस्तूस्थिती काय आहे? खरेच सरकार अशा प्रकारे २ महिन्यांचे एकत्रित पैसे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीना देणार आहे का? अशी विचारणा केली आहे. सोमवारी सकाळी ११:०० पर्यंत राज्य सरकारने याचे उत्तर द्यावे, असेही आयोगाने म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही- हर्षवर्धन सपकाळ

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाहीये. दुसऱ्या दिवशी मतदान असताना १४ जानेवारीला या योजनेच्या लाभार्थीना एक नाही तर दोन महिन्यांचे पैसे सरकार देणार असेल तर तो आचारसंहितेचा भंग आहे. आयोगाने हा प्रकार रोखला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे, असं काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.