एक्स्प्लोर

Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे.

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरुन बीडमधील एका पत्रकार परिषदेतील व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्यावर टीका करण्यात आली होती. गुंगी गुडिया अशा शब्दात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांवर टीका केली, या टीकेनंतर राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेत काँग्रेसविरुद्ध आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह काँग्रेस नेत्यांचा निषेध केला जात आहे. तर, जय पवार (Jay Pawar) यांनीही या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसला सुनावले होते. आता, करुणा शर्मा-मुंढे (Karuna sharma) यांनी जय पवारांना प्रतिसवाल केला आहे.  

काँग्रेसच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, जय पवार यांच्या याच महिला सन्मानाचा धागा पकडत करुणा शर्मा यांनी जय पवार यांना सवाल केला आहे. तसेच, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करणार का, असा सवालही त्यांनी विचारला.  

धनंजय मुंडेंवर राष्ट्रवादी पक्ष काहीच बोलत नाही

अजित पवार यांच्या अपघातावर सुनेत्राताई तुम्ही काहीच बोलत नाहीत. धनंजय मुंडेसारखा व्यक्ती तुम्हाला बोलण्यापासून थांबवतो तेव्हा सुद्धा तुम्ही काहीच बोलत नाहीत. ज्या धनंजय मुंडेने आपल्या बायकोवर अत्याचार केले, तिला त्रास दिला, तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काहीच बोलला नाही, असे म्हणत बीडमधील व्हायरल व्हिडिओ आणि काँग्रेसने केलेल्या टीकेवरुन आता करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, जय पवार यांनाही करुणा शर्मा यांनी प्रश्न विचारला आहे.  

करुणा शर्मांचा जय पवारांना सवाल

जय पवार म्हणतात मी प्रत्येक महिलांच्या पाठीशी आहे, तर जय दादा तुम्ही महिलांच्या मागे असल्याचे सांगता तर मग धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करणार का? असा सवाल करुणा शर्मा यांनी विचारला आहे. 

बीडमध्येही राष्ट्रवादीचा संताप

काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल 'गुंगी गुडिया' असे वक्तव्य केल्यामुळे बीडमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संताप दिसुन येत आहे. या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात 'पार्थ-जय' प्रतिष्ठान आणि समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना शेतकऱ्याच्या आसुडाने फटकारून निषेध नोंदवला. 

लातुरातही राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन सपकाळांचा निषेध

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लातुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आक्रमक झाला असून, आज राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत, भविष्यात अशाप्रकारची वक्तव्ये केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा

सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Shivsena : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget