एक्स्प्लोर

मोठी बातमी : सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटी निधी वर्षभरात वळवला, लाडकी बहीणला सर्वाधिक निधी!

Ladki Bahin Yojana: आत्तापर्यंत सामाजिक न्याय आणि आदीवासी विभागाचा मोठ्या प्रमाणावर निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवला असल्याची माहिती आहे.

मुंबई: राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सरकारची डोकेदुखी ठरू लागल्याचं चित्र आहे. योजनेसाठीचा निधी जमवताना सरकारची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे. आत्तापर्यंत सामाजिक न्याय आणि आदीवासी विभागाचा मोठ्या प्रमाणावर निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवला असल्याची माहिती आहे.  त्यामुळे गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी तुट सामाजिक न्याय विभाग अनुभवत आहे. लाडक्या पात्र बहिणींना दरमहा योजनेचा 1500 रूपये निधी पुरवण्यासाठी इतर विभागांच्या निधींना कात्री लावली जात आहे. मे महिन्याचा निधी पात्र महिलांना देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. 

लाडक्या बहिणींसाठी आत्तापर्यंत वळवलेला निधी

 - सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी तीस लाखांचा निधी दोन वेळा वळवला आहे 
- म्हणजेच सामाजिक न्याय या विभागाचा एकूण आतापर्यंत 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला आहे 
- आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी तीन वेळा वळवला आहे. 
- आदिवासी विभागाचे आतापर्यंत 1हजार 7 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. 
- दोन्ही विभागांचा मिळून 1827 कोटींचा निधी लाडके बहीण योजनेकडे वळवला आहे.
-  वर्षभरात तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जाणार

लाडक्या बहिण योजनेसोबत आणखी दोन योजनांसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जाणार आहे. वर्षभरात तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 3 हजार 960 कोटी रूपयांचा निधी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 1320 कोटी तर घरकुल योजना/ प्रधानमंत्री आवास योजना (ग्राम विकास )1485 कोटी वळवले जाणार आहेत. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष आलेल्या निधीमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे निधी दिला असल्याची माहिती सभागृहात दिली, मात्र मागील पाच वर्षांपासून निधीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याच पाहायला मिळतं आहे.

मागील पाच वर्षांतील प्रत्यक्ष किती तुट 

सन 2021-22 वर्षात 4705  कोटींची तुट

सन 2022-23 वर्षात 5470 कोटींची तुट

सन 2023-24 वर्षात 6476 कोटींची तुट

सन 2024-25 वर्षात 6764 कोटींची तुट

सन 2025- 26 वर्षात 7314 कोटी रुपयांची तूट आहे 

मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता यावर्षी सर्वाधिक तूट सामाजिक न्याय विभागाची पाहायला मिळते आहे. त्यामुळे वित्तमंत्री यांनी केलेला दावा आणि प्रत्यक्ष मिळालेला निधी यात मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. यावर्षी सामाजिक न्याय विभागाला 22 हजार 658 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लाडकी बहीण आणि इतर योजनांचं अतिरिक्त मिळून 29 हजार 932 कोटीचा निधी आहे. तरीही सामाजिक न्याय विभागांमध्ये 7314 कोटी म्हणजेच एकूण बजेटच्या 2.44 टक्के निधी कमी प्राप्त झालेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar-Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात सनईचौघडे! पार्थ पवार- कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा; भावाची पत्रिका शेअर करत रोहित पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले 'प्रेमाच्या रेशीमगाठीत...'
पवार कुटुंबात सनईचौघडे! पार्थ पवार- कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा; भावाची पत्रिका शेअर करत रोहित पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले 'प्रेमाच्या रेशीमगाठीत...'
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Eknath khadse: 'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'

व्हिडीओ

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Embed widget