Who is Sachin Ahir: सहा खासदारांच्या धक्क्यातून सावरत नाहीत, तोवर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का देण्यात आलाय. फक्त आणि फक्त दोनच आठवड्यांत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दुसरा धक्का दिला आहे. बरं यावेळी उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू अशा शिलेदाराचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर (Who is Sachin Ahir) शिंदेंच्या गळाला लागले आहेत. खरं तर ठाकरे सेनेकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. त्यांनी वरळी विधानसभेतही (Worli Assembly Constituency) वरळी मतदारसंघाचं (Worli Constituency) प्रतिनिधीत्व केलेलं. पण, आता शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाकडून सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.
विश्वासू असणाऱ्या सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? (Sachin Ahir Part Ways With Uddhav Thackeray Shiv Sena)
सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते त्यातील सचिन अहिर होते. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आलेली. पण, खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती, समोर आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर तातडीनं शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती समोर येतेय.
वरळी मतदारसंघात मोठी ताकद
वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केलंय. याशिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्येसुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघाचा विचार केला तर सचिन अहिर यांच्या जाण्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय.
- सचिन अहिर हे 2022 मध्ये विधान परिषदेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आले होते. 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला.
- वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना सचिन अहिर यांची विधानसभा निवडणूक लढवण्यास मदत होईल, यासाठी आपल्या पक्षात शिवसेनेने घेतलं होतं.
- 2022 ला विधानपरिषदेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं सचिन अहिर यांना संधी दिली.
कोण आहेत सचिन अहिर? (Who is Sachin Ahir?)
मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. 21 मार्च 1972 रोजी जन्मलेले अहिर म्हणजे, मुंबईत साजऱ्या केल्या जाणाऱ्या मोठ्या 'दहीहंडी' उत्सवासाठी ओळखलं जाणारं एक नाव. आपल्या पत्नीसोबत सचिन अहिर 'श्री संकल्प प्रतिष्ठान' ही संस्था चालवतात. याच संस्थेमार्फत ते मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. संपूर्ण वरळी परिसरात सचिन अहिर यांची संस्था लोकप्रिय आहे. या संस्थेमार्फत ते अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करतात.
सचिन अहिर यांनी 1993 मध्ये 'राष्ट्रीय मिल मजदूर संघा'पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला सचिव म्हणून काम पाहिल्यानंतर, त्यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर, 1996 पासून त्यांनी 'महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघा'चं नेतृत्वही केलंय. माझगाव डॉक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या संस्थांमधील कामगार संघटनांचं नेतृत्व करताना, त्यांनी संबंधित उद्योगांमधील कामगारांसाठी वेतनवाढीचा करार घडवून आणला आणि कामगार चळवळीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. या कामगिरीमुळे त्यांना गिरणगावात मोठी प्रसिद्धी मिळाली.
1999 ते 2019 या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) होते. त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून, 1999 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिलंय. उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये त्यांची शिवसेनेचे उपनेते म्हणून नियुक्ती केलेली. अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांच्या पक्षातून केली होती आणि त्यानंतर ते शिवसेनेत सामील झाले.
आदित्य ठाकरेंसाठी सोडला वरळी मतदारसंघ (Sachin Ahir Gave Up Worli Constituency For Aaditya Thackeray)
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला आणि त्या जागेवरून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा विजय सुनिश्चित केला. 2024 च्या निवडणुकीत, मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे हे रिंगणात उतरलेले असतानाही, अहिर यांनी आदित्य ठाकरे यांचा विजय खेचून आणला.
सचिन अहिर यांची राजकीय कारकीर्द (Sachin Ahir Political Career)
- सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार
- विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी
- वरळीमधून 1999, 2004, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी
- 2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
- 26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
- 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती
- 2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
- 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत
- 30 जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींसोबत नातं काय? (Nephew Of Underworld Don Mumbai Daddy Arun Gawli)
मोस्ट-वॉन्टेड आणि फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही कधीकाळी धडकी भरवणारा अंडरवर्ल्ड डॉन डॅडी म्हणजेच, अरुण गवळींशी सचिन अहिर यांचं नातं आहे. सचिन अहिर अरुण गवळींचे भाचे आहेत. सचिन अहिर हे डॅडींची गवळींची बहीण आशालता यांचे पुत्र आहेत. आशालता यांचा विवाह मोहन गंगाराम बनिया (उर्फ अहिर) यांच्याशी झाला होता, जे एअर इंडियामध्ये 'लोडर' म्हणून काम करायचे. त्याचेच पुत्र म्हणजे, सचिन अहिर.
महत्त्वात्या इतर बातम्या :
