एक्स्प्लोर

Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?

Lavani Dance: मुंबई, ठाणे व त्यांच्या उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या संबंधित DJ लावणी व नृत्य कार्यक्रमांची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पुणे : पारंपरिक लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डीजे लावणी व नृत्य कार्यक्रमांवर नियंत्रण कधी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. दही हंडी उत्सवात अश्लील नृत्य करणाऱ्या कलाकारांवर कारवाई होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र न घेतलेल्या कलाकारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने (Lavani Dance) अश्लील नृत्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शासनाने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या पूर्वपरिनिरीक्षणाबाबत स्पष्ट आदेश काढले आहेत, या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, (Lavani Dance) लावणी, लोकसंगीत, मेळे आदी कार्यक्रमांसाठी संबंधित कार्यक्रमाची संहिता, निवेदन किंवा सारांश तपासून मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, तर  मुंबई, ठाणे आणि इतर शहरात झालेल्या अशा कार्यक्रमांची चौकशी करण्याची राष्ट्रवादीने मागणी केली आहे.(Lavani Dance)

NCP Letter on Lavani Dance:  राष्ट्रवादीनं लिहलं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राची प्रतिष्ठा जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. विशेषतः पारंपरिक लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील DJ लावणी व नृत्य कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या पूर्वपरिनिरीक्षणाबाबत स्पष्ट आदेश काढले आहेत. सदर आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रमांसाठी संबंधित कार्यक्रमाची संहिता, निवेदन किंवा सारांश तपासून मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र (Suitability Certificate) घेणे आवश्यक आहे. मात्र, शासनाने आदेश काढूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसेल, तर त्या आदेशाचा उपयोग काय? हा अत्यंत गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहिला आहे. मुंबई, ठाणे व उपनगरांमध्ये शासनाच्या आदेशाची अवहेलना?

महोदय, अलीकडील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे व त्यांच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी गौतमी पाटील, राधा पाटील तसेच इतर UP आणि बिहार मधील महिला कलाकारांच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्यप्रकार सादर झाल्याच्या तक्रारी व दृश्यफिती समोर आल्या आहेत. काही ठिकाणी महाराष्ट्राबाहेरील कलाकारांनाही अश्लील स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरणासाठी आणण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र होते का? कार्यक्रमांची संहिता किंवा निवेदन मंडळाकडे पूर्वपरिनिरीक्षणासाठी सादर करण्यात आले होते का? शासनाच्या आदेशानुसार आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? या प्रश्नांची उत्तरे संबंधित पोलीस प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे. शासनाचा आदेश लागू झाल्यानंतरही अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जात असेल, तर मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे की नाही, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असल्यास, ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून शासनाच्या अधिकाराची व कायद्याच्या अंमलबजावणीची गंभीर बाब आहे.

शासनाचा आदेश कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा आहे! महोदय, दहीहंडी उत्सव कोणत्या ही मोठ्या राजकीय नेत्याचा असो, आमदारांचा असो, खासदारांचा असो किंवा मंत्र्यांचा असो—शासनाचा आदेश सर्वांसाठी समान असतो. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाखाली शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही. कायदा सर्वांना समान आहे आणि शासनाने काढलेला आदेश कोणत्याही व्यक्तीच्या पदापेक्षा मोठा आहे.

त्यामुळे मुंबई, ठाणे व त्यांच्या उपनगरांमध्ये झालेल्या संबंधित कार्यक्रमांची चौकशी करून, त्या कार्यक्रमांना परवानगी देताना शासनाच्या आदेशाचे पालन झाले होते की नाही, याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. गृहमंत्री म्हणून आपण तातडीने लक्ष घालावे! महोदय, आपण राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असल्याने या गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष घालावे, अशी आमची विनंती आहे. शासनाने आदेश काढल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर संबंधित पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून अश्लील DJ लावणीच्या विरोधात सातत्याने आवाज उठविला आहे. या पाठपुराव्यानंतर शासनाने चांगल्या पद्धतीने आदेश काढला असताना, त्याची अंमलबजावणीच होत नसेल, तर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर घाला घालणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्यासारखे आहे. म्हणूनच, शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

NCP Letter on Lavani Dance: राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्या 

✓ मुंबई, ठाणे व त्यांच्या उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या संबंधित DJ लावणी व नृत्य कार्यक्रमांची तातडीने चौकशी करण्यात यावी.
✓ संबंधित कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करणाऱ्या कलाकारांकडे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र होते की नाही, याची तपासणी करण्यात यावी.
✓ संबंधित कार्यक्रमांची संहिता, निवेदन किंवा सारांश मंडळाकडे पूर्वपरिनिरीक्षणासाठी सादर करण्यात आला होता की नाही, याची चौकशी करण्यात यावी.
✓ शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास, संबंधित अश्लील नृत्य कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांवर तसेच संबंधित दहीहंडी मंडळाचे मुख्य आयोजक व जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत.
✓ मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याचा अहवाल तातडीने मागविण्यात यावा.
✓ संबंधित पोलीस प्रशासनाने शासनाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आढळल्यास, जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी.
✓ शासनाचा आदेश सर्वांसाठी समान असून, कोणत्याही राजकीय दबावाखाली त्याची अंमलबजावणी थांबवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात यावा.
✓ आगामी सर्व सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमांमध्ये अश्लील DJ लावणी व नृत्यप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.
महोदय, शासनाने आदेश काढूनही अंमलबजावणी होत नसेल, तर हा शासनाच्या आदेशाचा अपमान आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
शासनाचा आदेश कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या पदापेक्षा मोठा आहे. कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे संबंधित आयोजकांवर व अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. तसेच, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधित पोलीस आयुक्त अपयशी ठरले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास, त्यांच्यावरही नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित पोलीस आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करीत आहोत. आपण या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती.

सोलापुरातील ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

सोलापुरातील भोगाव परिसरातील ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. अश्लील नृत्य करणाऱ्या 15 महिलांसह 26 गिऱ्हाईकांवर कारवाई करण्यात आली आहे. याऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला तोकडे कपडे घालत अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. रविवार रात्री सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला, ऑर्केस्ट्रा बारवर केलेल्या कारवाईच्या दरम्यान 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
Amravati: अमरावतीत दोन्ही आघाड्यांत बिघाडी? भाजपच्या 3 बड्या नेत्यांचं बंड, शिवसेनेच्या माजी आमदारानेही दंड थोपटले; तर काँग्रेस-उबाठामध्ये मैत्रीपूर्ण लढत?
अमरावती शिक्षक मतदारसंघात दोन्ही आघाड्यांत बिघाडी? भाजपच्या 3 बड्या नेत्यांचं बंड, शिवसेनेच्या माजी आमदारानेही दंड थोपटले; तर काँग्रेस-उबाठामध्ये मैत्रीपूर्ण लढत?
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: लोकांना बाहेरुन आणले, नवनाथ बन यांनी व्हिडीओ दाखवले; रोहित पवार म्हणाले, इकडे भुंक, तिकडे चाव...खालच्या कमेंट वाचा!
लोकांना बाहेरुन आणले, नवनाथ बन यांनी व्हिडीओ दाखवले; रोहित पवार म्हणाले, इकडे भुंक, तिकडे चाव...खालच्या कमेंट वाचा!
Rohit Pawar On Nitesh Rane MPSC Protest Pune: विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget