Mohan Bhagwat: "जनरेशन-झेडने आंदोलन करू नये असे आम्ही म्हणणार नाही. संविधान त्यांना लोकशाही मार्गाने आपली मते व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार देते. पण आंदोलन कसे केले जात आहे, याचाही आपण विचार केला पाहिजे." असे भाष्य Gen-Z चर्चेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. आज मुंबईत भागवत यांनी जाहीर संवाद साधला.
पेलेट गनचा वापर करण्यात आला, यावर तुमचे मत काय आहे?
मुलांना देवाचे रूप मानले जाते, तरीही आंदोलनादरम्यान त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि पेलेट गनचा वापर करण्यात आला. यावर तुमचे मत काय आहे? असा सवाल Gen Z आणि Gen अल्फासोबतच्या चर्चेत मोहन भागवत यांना विचारण्यात आला. यावेळी मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं. भागवत म्हणाले की, हे का घडलं? काय झालं? आपल्याला कारणांचा शोध घ्यावा लागेल. तुम्हाला हवी असलेली माहिती माझ्याकडे नाही. त्यांनी पुढे सांगितले की, मला वाटतं, तुमच्याकडेही सगळं काही नसेल, पण, हे पाहिल्यानंतर, आपल्याला काय चुकलंय ते ठरवावं लागेल. काय झालं, का झालं, हे मी आत्ता सांगू शकत नाही. कारण मला माहित नाही की काय बरोबर आहे आणि काय चूक. तुम्ही ते वाचत आहात आणि मी तुम्हाला सांगत आहे, आणि मी सुद्धा ते वाचत आहे. त्यामुळे मला माहित नाही की काही मॉड्यूल्स वगैरे अस्तित्वात आहेत की नाही, पण, जर मला डोळे झाकून विश्वास ठेवायला सांगितलं, तर मी Gen Z वर विश्वास ठेवेन.
आंदोलने हे सुद्धा चर्चेचेच एक रूप असते
मोहन भागवत म्हणाले की, आपल्याला हेही समजून घेणे आवश्यक आहे की, जर जनरेशन-झेड आवाज उठवत असेल, तर त्यामागे नक्कीच एक खरा मुद्दा असला पाहिजे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरोधात नसावे, तर व्यवस्थेतील सुधारणांसाठी असावे. जर संवादाचा अभाव नसता, तर हे आंदोलन यशस्वीही झाले नसते आंदोलन हे सुद्धा संवादाचेच एक रूप आहे. आपण इथे बसून बोलत आहोत का? नाहीतर, आपला वाद सुरूच राहील. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, तर संवादाने त्या सुटतील; मी म्हणेन की हे तातडीचे आहे. लोकशाहीमध्ये, आंदोलने हे सुद्धा चर्चेचेच एक रूप असते. त्यांनी पुढे सांगतिले की, जर काही करायचे असेल, तर ते सर्वांच्या सहभागाने केले पाहिजे, विभाजनाने नव्हे. जनरेशन-झेडबद्दल बोलायचे झाल्यास, शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे, त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. माझा अनुभव आहे की, जेव्हा आम्ही या वयाचे होतो, तेव्हा आम्ही प्रश्न विचारत नसू. पण जनरेशन-झेडला प्रत्येक गोष्टीची तार्किक उत्तरे हवी असतात. त्याला केवळ उत्तरेच नव्हे, तर आपलेपणाची आणि आपुलकीची भावनाही हवी असते.
LGBTQ लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग
भागवत म्हणाले की, LGBTQ लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत. ते व्यवस्थेचाच एक भाग आहेत. तथापि, विवाह हा एक वेगळा विषय आहे. ही कुटुंबासाठी निर्माण केलेली एक संस्था आहे. पुढच्या पिढीला कुटुंब म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही पालक हे आवश्यक घटक आहेत. हे शतकानुशतके चालत आले आहे. आता, जर सध्याच्या व्यवस्थेत व्यत्यय आणला, तर समस्या निर्माण होतील. जर तुम्ही नवीन व्यवस्था आणत असाल, तर समाजाने आधी त्यासाठी तयार असले पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या
