एक्स्प्लोर

Jayant Patil : निवडणूक आयोगाला आम्ही महत्त्वाचे पुरावे दिले; आम्ही अनंत चुका दाखवल्या, पत्ते अपूर्ण, घराच्या चुकीच्या नोंदी, बैठकीमध्ये काय घडलं, जयंत पाटलांनी सगळं सांगितलं

Jayant Patil : काल आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना आम्ही अनंत चुका दाखवल्या. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं सगळं म्हणणं आम्ही पाठवतो.

मुंबई: मुंबईत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १५ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी, (Mahavikas aghadi) मनसे (MNS) आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत पुन्हा बैठक झाली. बैठकीत पक्षांनी निवडणूक प्रक्रियेतील शंका, मतदार यादीतील त्रुटी व निवडणुकीच्या पारदर्शकतेसंबंधी मुद्दे उपस्थित केले.

MVA AND MNS Meeting : बैठकीनंतरनंतर पार पडली पत्रकार परिषद

या बैठकीत प्रमुख उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना), राज ठाकरे (मनसे), जयंत पाटील (काँग्रेस), जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई आणि अजित नवले यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर मतदारांची अचूक नोंद, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली. विरोधकांचे मत आहे की, मतदार यादीतील चुका, प्रक्रियेतील विलंब किंवा प्रशासनाच्या निर्णयांमुळे निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. या बैठकीनंतर पुन्हा या सर्व नेत्यांची एक बैठक पार पडली त्यानंतर आता पत्रकार परिषद पार पडली, यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बैठकीतील माहिती दिली.

Jayant Patil : त्यांना आम्ही अनंत चुका दाखवल्या

जयंत पाटील म्हणाले, काल आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना आम्ही अनंत चुका दाखवल्या. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं सगळं म्हणणं आम्ही पाठवतो. या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करतो. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं काही सुचवल्यामुळे आज त्याबाबतच्या प्रश्न राहिल्याने आम्ही त्यांची भेट घेतली. कालच्याप्रमाणे आजही सर्व विरोधी पक्ष नेते तिथे गेले. काही महत्त्वाचे पुरावे आम्ही तिथे दाखवले आणि त्या पुराव्यांच्या सहित आम्ही आज त्यांना आम्ही काही माहिती दिली. आम्ही त्यांना पत्र ही दिलेले आहे. पत्र देत असताना मतदार यादीतील मतदारांचे मोठ्या प्रमाणावर पत्ते अपूर्ण आहेत. काही प्रमाणे चुकीचे टाकलेले आहेत. त्याचबरोबर मतदार यादीत असलेल्या पत्त्यावर तो मतदार राहत नाही. त्यातील काही उदाहरणे त्यांना दिली. त्यामध्ये मुरबाड मतदार संघामध्ये बूथ क्रमांक आठमध्ये पारशी मतदारांचा एक घर आहे, तिथे चारशे मतदार आहेत. त्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, अनेक घराच्या चुकीच्या नोंदी आहेत किंवा चुकीचे पत्ते दिलेले आहेत.

Jayant Patil : महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्वेर दुसरं कोणी तरी चालवतो

वडनेरामध्ये, कामटीमध्ये घरक्रमांकचं नाही, बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आहे. एपीक नंबर एकच असतो मात्र मतदार यादीत अनेक असल्याचे निदर्शनास आणून दिले. नालासोपारामध्ये सुषमा गुप्ता महिलेचे नाव ६ वेळा नोंदवले आहे. १२ ऑगस्टला आमच्या कार्यकर्तयाने दुपारी दाखवलं. ६ वाजता मतदानानंतर त्या महिलेचे नाव काढलं होतं. आपण एक चॅनेलमधून बातमी दाखवतो. दुपारी ३ ला ती नावं असतात ६ वा नावं काढतात. निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं, ही नावं कोणाच्या सांगण्यावर काढली. तक्रार कोणी केली. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्वेर दुसरं कोणी तरी चालवतो. राज्य किंवा केंद्राच्या हातात ही यंत्रणा नसून बाहेरूनच कोणी तरी हे चालवतं आहे असा आमचा विश्वास बसला असल्याचंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

Jayant Patil : त्वरीत कारवाई सुरू करा अशी आमची मागणी

त्याचबरोबर पुण्यात ८६९ मतदारांची नोंद आहे. दर तासाला मतदार यादी जाहिर होते, कोणी कुठे किती मतदान केलं. विधानसभेला हे सिस्टम तोडलं. थेट दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी जाहिर केलं. आम्ही विधानसभेला याद्या वाचल्या. हेच स्थानिक स्वराज्य संस्था निवणूकीत चालू राहिलं तर कठीण आहे. मुदत वाढवून चालणार नाही. मतदार याद्या तपासा. बोगस मतदार काढून टाका. जाहीरपणे  एक खासदार सांगतात २० हजार बाहेरून मतदार आणल्याने माझा विजय झाला याची नोंद घ्या आणि त्वरीत कारवाई सुरू करा अशी आमची मागणी आहे, असंही पुढे जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

Jayant Patil : मतदारांची प्रायव्सीचं कारण देत माहिती दिलेली नाही

पुढे जयंत पाटील म्हणाले, १२ तारखेला आम्ही हे पत्र दिलं त्याची दखल घेतली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगालाही दिली, सोईचे ठेवतात गैरसोईचे काढत आहेत. हे सर्व कुणीतर माॅनटर करत असल्याचं निदर्शनास आलं. पण तक्रार केली, तर दखल नाहीच. आता हे चालणार नाही. असं करून निवडणूका वेगळ्या दिशेने नेल्या जातात. सुषमा गुप्ता नालासोपारा दुपारी नाव होतं. ६ वा काढलं होतं. याची चौकशी नाही. मुरबाड मतदारांच्या घरापुढे डॅश - आहे असे ४०० लोकं आहे. पुण्यात ८७९ लोकं आहेत. नाशिकमध्ये ३ हजार ८२९ घरात ८१३ लोकं दाखवलेले आहेत. हे पुरावे आहेत हवेत बोलत नाही. अशोक पवार शिरूर गावात काही प्रश्न उपस्थित केले. घर क्रमांक १ मध्ये ८८८ लोकं दाखवलेत. लेखी तक्रार केल्यावर मतदारांची प्रायव्सीचं कारण देत माहिती दिलेली नाही. ही महिती गोपनिय असल्याचे सांगत माहिती दिलेली नाही. कायदा आहे ३२ नंबरचा कोणी कुठलाही पुरावा मागितला तर तो ती महिती कोणत्या आधारवर नोंदवलं हे द्यावे लागेल, आम्हीच कायदे सांगतोय, असंही जयंत पाटील म्हणालेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
Smriti Mandhana, Palash Muchhal Net Worth: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल, नेटवर्थच्या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड; महिन्याभरात किती कमावतात?
स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कुणाकडे सर्वाधिक बँक बॅलेन्स? दोघांचं नेटवर्थ किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
Raksha Khadse On Eknath Khadse And Girish Mahajan : दोघांमधील वाद कसे कमी होतील हाच प्रयत्न मी करते - रक्षा खडसे
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
Smriti Mandhana, Palash Muchhal Net Worth: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल, नेटवर्थच्या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड; महिन्याभरात किती कमावतात?
स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कुणाकडे सर्वाधिक बँक बॅलेन्स? दोघांचं नेटवर्थ किती?
Phaltan Accident: भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून....; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून....; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या
Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं  सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल
पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल
Nagpur Crime BJP : नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget