Vishal Patil on Jayshree Patil, सोलापूर : "आमच्या घरात सुद्धा भारतीय जनता पक्षाने फुट पाडली आहे. (Vishal Patil on BJP) आमच्या घरात फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करुन घेतला. आमचे पालकमंत्री रोज भाषण करतात की विशाल पाटलांना आम्ही घेणार आहे. अहो...मी अपक्ष निवडून आलो. भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो. मी लोकांना सांगितलं की, मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे, म्हणून मी निवडून आलो", असं सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या.
लोक सोडून जात असतील, तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार - विशाल पाटील
विशाल पाटील म्हणाले, मी अपक्ष निवडून आलो, मी जरी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे. काँग्रेसचा विचार सहजासहजी दाबता येत नाही. महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला. काही व्हायचं आहे ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागलं, अडचणीत यायला लागलं तरी दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. थांबण्याची आमची क्षमता आहे . चूक केली असेल तर घाडसाने सामोरं जाण्याची गरज होती. कार्यकर्त्यांना स्वत:च्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात असतील, तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा विचार मजबूत आहे. मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते सामान्याला नेता बनवू शकतात.
भाजप सरकारने महाराष्ट्र कसा लुटायचा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र महाराष्ट्राला लाचार करण्याचं काम दिल्लीवाल्यानी केले आहे. दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा, एवढी ताकत महाराष्ट्रात आहे. शक्तीपीठ महामार्गात जास्तीत जास्त कसा पैसा खाता येईल, एवढाच उपयोग महाराष्ट्राचा चालला आहे. तुमच्या थोडं खिशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर महाराष्ट्राच्या जीवावर राज्य करायचं. हा भाजपचा डाव आहे, अशी टीकाही विशाल पाटील यांनी केली.
पुढे बोलताना विशाल पाटील म्हणाले, दिल्लीत रोज काहीतरी चालू आहे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसणार हा दिवस लांब नाही. त्यानंतर गेलेले सगळे म्हणतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या त्यावेळी घ्यायचं का?
इतर महत्त्वाच्या बातम्या
शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
