ठिकाण एकच उद्घाटन मात्र दोन वेळा, 4 वाजता भाजपकडून तर आता बहुजन विकास आघाडीकडूनही लोकार्पणाची तयारी, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं
विरार येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनावरून सकाळपासून भाजप आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.
Virar News : विरार येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनावरून सकाळपासून सुरू असलेला भाजप आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडीमधील वाद अखेर काहीसा शमल्याचे चित्र आहे. दुपारी चार वाजता भाजपकडून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले आहेत. आता सायंकाळी पाच वाजता सत्ताधारी बहुजन विकास आघाडीकडून याच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पाच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या या राजकीय संघर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविंद्र पाठक यांच्या एंट्रीमुळं संपूर्ण प्रकरणाला नवा राजकीय ट्विस्ट
या संपूर्ण वादात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. भाजपसोबत या उद्घाटनाला विरोध करणाऱ्या भूमिकेत शिवसेना शिंदे गटाचाही सहभाग होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार रविंद्र पाठक यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भेट दिली. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेल्या या राजकीय रणकंदनानंतर दुपारी भाजपकडून झालेले उद्घाटन आणि त्यानंतर झालेली रविंद्र पाठक यांच्या एंट्रीमुळं संपूर्ण प्रकरणाला नवा राजकीय ट्विस्ट मिळाला आहे. आता सायंकाळी पाच वाजता बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकाच दिवशी, एकाच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून उद्घाटन आणि दोन्ही ठिकाणी एकाच व्यक्तीच्या हस्ते फीत कापण्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
कार्यक्रमाच्या पत्रिकेत भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे नाव नसल्याने भाजपकडून तीव्र नाराजी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या पत्रिकेत भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे नाव नसल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. हा थेट राजशिष्टाचाराचा भंग असल्याचा आरोप करत भाजपने स्वतंत्रपणे उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला. शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्यासह भाजपचे नगरसेवक क्रीडासंकुलात दाखल झाले. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांनी संकुलात प्रवेश करून उद्घाटन उरकले. त्यानंतर सायंकाळी प्रस्तावित असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवत भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक संकुलाच्या आवारातच ठिय्या आंदोलनाला बसले. त्यानंतर सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता बहुजन विकास आघाडीतर्फे क्रीडासंकुल आणि नाट्यगृहाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर टीका केली. श्रेय घेण्यासाठी मेहनत करावी लागते, केवळ रील्स बनवून चालत नाही,असा टोला ठाकूर यांनी या वेळी लगावला.
Before You Go
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं





















