Vinayak Raut Gitesh Raut Marathi News: ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत (Vinayak Raut) आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर आता 23 जुलैला सुनावणी होणार असून 23 जुलैपर्यंत विनायक राऊत, गितेश राऊत (Gitesh Raut) यांची चौकशी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांच्या पती, सासऱ्यांसह कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की,ते आरोप म्हणदे वायफळ बडबड असते. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते बोलत आहे. त्यांनीच दिलेल्या पेपरवरून मी बोलत आहे, त्यांनी दिलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे. मला भिती वाटत असल्याने मी आई वडिलांना सोबत घेऊन असायचे, मग तेव्हाच तक्रार का दाखल केली नाही. मी स्वतःहून माहेरी गेली असून स्त्रीधन नेलं आहे. सासरी येताना किती आणलं आणि नेतांना किती नेलं हे सांगा, त्यांच्या डिंमाड दुप्पटीने वाढत होत्या, आधी २ कोटी नंतर फ्लॅट, गाडी, नंतर ते ५ कोटींवर गेलं, १२ कोटी ५० लाख इतकी डिमांड वाढलेली आहे, दर महा ५ लाख, १० कोटी एक रक्कम दिली, दरमहा भाडे १ लाख दिले जाते. ३ बीएचके ईएमआय तुम्हीच भरायचे असं त्यांनी सांगितल्याचंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
Vinayak Raut : या सगळ्या आरोपांना मी भीक घालत नाही
पुढे राऊत म्हणाले की, या सगळ्या आरोपांना मी भीक घालत नाही. आमचे दोन दैवत आहेत, एक पांडुरंग आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे या शिवाय कुलदैवत आहे, माझा पोलिस खात्यावर विश्वास आहे. ज्यांची ज्यांची नावे दिली आहेत, त्यांची चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल. भांडुपचे माझे मोठे भाऊ हे ज्येष्ठ आहेत, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व करतो ते करत नसतील. हे सर्व षडयंत्र कोण करतयं हे येणाऱ्या काळात आम्ही सांगू. आमचं प्रोटेक्शनही काढलं. आम्ही सर्व चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
Vinayak Raut : तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे
ज्यांना वायफळ बडबड करायची असते, पुर्वग्रह दूषित ठेवून कोणाच्यातरी सांगण्यावर अशा पध्दतीने बदनामी करण्याची भाषा करायची असते. मी त्यांनी दिलेला पेपरच्या आधारे बोललेलो आहे, त्याच्यामध्ये बाहेरचं काहीच बोललेलो नाही आहे, मला त्यामुळे त्यांच्या या वायफळ बोलण्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकताच नाही, त्यांची स्वतःची जी तक्रार आहे, त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की, या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्याने मी नेहमी, मी नेहमी, माझ्या आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगी सुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैर प्रकार झाला असं जर निदर्शनात आलं तर तातडीने त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली? हा विषय तर येतोच दुसरं म्हणजे इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं या त्यांच्या तक्रारीमध्ये, मी 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतः माहेरी गेलेली आहे. जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे. म्हणजे जाताना 10 ते बारा बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन, आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेले आहे, किती नेलं आहे हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा, येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं, आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा, पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काय पडायचं नाहीये, ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उगाळून काढायचं नाही, खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे. तिच्या तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं पण एक मात्र नक्की आहे की, ज्या पद्धतीने त्यांची चर्चा आमच्या वकील महोदयांशी चालू होती तर प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचा दुपटीने वाढत होती, सुरुवातीला दोन करोडची डिमांड होतं, थ्री बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे, ऑटोमॅटिक कारम राहिलेला आहे, दोनच्या नंतर डायरेक्ट पाच करोडवर आलं आणि पाच करोडच्या नंतर या याच्यामध्ये त्यांनी जे दिल काल जे वाचून दाखवलेलं आहे, 10 करोड रुपये, दोन करोड पुन्हा दिले असल्याचं यावेळी विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.
Vinayak Raut : ज्या डिमांड ठेवलेले आहेत ना त्या पूर्ण करून घेण्यासाठी...
टोटल 12 करोड 50 लाख एवढी डिमांड हे त्यांची वाढलेली आहे. दर महिन्याचे पाच लाख रुपये, 50 लाख एक रकमी, दहा करोड एक रकमी, पुन्हा दोन करोड एक रकमी आणि प्लस घरभाडं दरमहा ₹1 लाख शिवाय थ्री बेड रूम घर त्याचा जो ईएमआय जो तो भरणार नाही, ते भरला पाहिजे, अशा पद्धतीचे ज्या डिमांड ठेवलेले आहेत ना त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनाव करून केलेल्या आरोप आहेत, त्या आरोपांना आम्ही काय भीक घालत नाही, कारण आम्ही अध्यात्मिक आहोत आणि आमची आमचं दैवत आमच्या समोर पंढरीचा पांडुरंग आहे, तसच आमच्या समोर आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यामुळे आम्हाला या दोन दैवताशिवाय इतर कोणाच्याकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही, कुलदेवता, ग्रामदेवता तर आमच्या असतातच कोकणातल्या आणि त्यांच्याकडे जाणं म्हणजे काय गुन्हा ठरत नाही, त्यांच दर्शन घेणं, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.माझा पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्यांची ज्यांची नाव त्यांनी दिलेली आहेत त्यांनाज्यावेळेला पोलीस चौकशी करतील त्यावेळेला ते समोर येईल त्यामुळे यांच्या बकवासगिरीवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी पोलिसांच्या चौकशीवर माझा विश्वास आहे त्यांनी चौकशी करावी, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
