Vikas Lawande नागपूर : महागाई, बेरोजगारी इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप, संघाकडून हिंदू-मुस्लिम, मराठा ओबीसी हे वाद पेटवले जात आहे. या मनुवादाचा मी पीडित आहे. यातूनच मला अटक झाली. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर संग्राम भंडारे (Sangram Bhandare) याला अटक का झाली नाही? माझ्यावर शाईफेकची घटना झाल्यानंतर धमक्या दिल्या, तरी कारवाई नाही? मला कुठली नोटीस न देता अटक केली. पोलीस म्हणतात हि नजरचुक होती, मात्र हि नजर चूक नव्हती. मला कारागृहात मात्र आदराने वागवलं. संघ परिवारातील लोक वारंवार शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांचा अवमान केला जातो. मात्र त्याचा विरोध संघाचे लोक करत नाही. सर्व संतांना वैदिक मनूवाद्यांनी छळले. मात्रआता माझा जीव गेला तरी मी थांबणार नाही. अशीप्रखरप्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande Attack) यांनीदिलीआहे. तेनागपूरयेथेबोलतहोते.
Vikas Lawande on Devendra Fadnavis : कदाचित माझ्या मृत्यूची वाट पहिली जात असेल
मी मुख्यमंत्र्यांना दोन वेळा निवेदन दिले, त्याचे अजून उत्तर नाही, साधी दखल पण घेतली नाही. कदाचित माझ्या मृत्यूची वाट पहिली जात असेल. असेही विकास लवांडे म्हणाले. माझ्यावर झालेला हल्ला हा भाजप पुरस्कृत हल्ला होता. तर संग्राम भंडारी हा वारकऱ्यांचा वेश घातलेला गुंड आहे. अशीटीकाही विकास लवांडे यांनीकेलीआहे.
Vikas Lawande: वारकरी वादाची आणि शाईफेकीची पार्श्वभूमी
दरम्यान, विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत. 'वारकरी संप्रदायात काही लोकांची घुसखोरी झाली आहे', असा दावा करत लवांडे यांनी सोशल मीडियावर काही वारकऱ्यांची एक यादी प्रसिद्ध केली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली होती. या शाईफेकीनंतर शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता.
एबीपी माझाशी बोलताना विकास लवांडे म्हणाले की, ९ तारखेला माझ्यावर जो संग्राम भंडारे आणि गुंडानी जीवघेणा हल्ला केला. त्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये माझी फिर्याद आहे. या ९ तारखेच्या हल्ल्याच्या आदल्या दिवशी ८ तारखेला संग्राम भंडारेंच्या भाजपची एक कार्यकर्ता आहे, मी त्या महिलेला ओळखत नाही नलिनीताई वायाळ त्यांच्या फिर्यादीवरून मला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत, ते मला चौकशीसाठी वाघोलीला नेलं जात आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, आक्षेपार्ह विधान केलं नाही, असंसदीय भाषा वापरली नाही, पण त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी काही शब्द वापरले त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या, पण त्यांनी पोलिसांना त्याचे काय पुरावे दिलेत ते पाहावं लागेल असंही विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
