एक्स्प्लोर

Girish Mahajan and Vijay Wadettiwar: बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते तर तुम्हाला देशात राहण्याचा अधिकार आहे का? वडेट्टीवार गिरीश महाजनांवर संतापले

Girish Mahajan and Vijay Wadettiwar: मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

Girish Mahajan and Vijay Wadettiwar: प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून, गिरीश महाजन यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Girish Mahajan and Vijay Wadettiwar: नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाजच वाटते. संविधान निर्माण करताना त्याला विरोध करणारी ही मंडळी आहे. त्यांचा संविधानावर विश्वास आहे का? बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटत असेल तर यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत त्यांना या देशात खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? संविधान निर्मात्याचे नाव घ्यायला लाज वाटते तर हे हुकूमशाही की लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले याचे उत्तर जनता मागेल, असा हल्लाबोल त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलाय. 

Girish Mahajan: नेमकं प्रकरण काय? 

दरम्यान, नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित करत मंत्री महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

आणखी वाचा 

Girish Mahajan: मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? गिरीश महाजनांच्या नव्या वक्तव्याने वाद आणखी चिघळला

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget