Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar : खासदार झाले म्हणून मालक ठरत नाही, नेत्यांचं आणि खासदार या दोघांचाही ते काम असतं. थोडा संयम ठेवून काम करावं लागतं, प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसलो तरी माझा उमेदवारीला विरोध केले म्हणून तिकीट कापणे आणि त्याला बाजूला सारने, हे चुकीच आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. पण जुना इतिहास काढायला गेलं तर बाळू धानोरकर यांना पक्षात मीच आणलं, मग त्यांचा प्रवेश झाला. प्रतिभा धानोरकर यांना घेऊन सहा वर्षे झाले. त्यामुळे मीच मालक आहे, असं म्हणणं ते योग्य ठरणार नाही. सगळ्यांना मिळून काम करावं लागतं. संयमाने बोलावे लागतं. असेम्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीखासदार प्रतिभा धानोरकरांवर (Pratibha Dhanorkar) तोफडागलीआहे. खासदार यांच्या गैरसमजातून वक्तव्य झालं असावं, त्यांनी संयम ठेवून बोलावं. त्यांचे राजकीय भविष्य मोठं आहे. असेहीतेम्हणाले. (Chandrapur Election 2026 Result)

Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar : आमच्यात कुठलही भांडण नाही, खासदार यांचा गैरसमज झाला 

मागील 25 वर्षापासून मी जिल्हा सांभाळत आहे. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) हे सहा वर्षांपूर्वी पक्षात आल्या. ज्यांनी जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सांभाळला, काम केलं, त्याच्यावर पक्ष वाढत आहे आणि शिल्लक आहे, अश्या लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाणार आहे का नगरपरिषद निवडणुकीत जीव ओतून काम केलं, त्यात मात्र खासदारांचा सहभाग नव्हता. महानगरपालिका निवडणुकीत आम्ही दोघांनी सह्याकरून एबीफॉर्म वाटप केले. सहमतीने उमेदवारी वाटप झाली, 60 जागेवर उमेदवार ठरवले. वसंत पुरके यांनी सहा जागेवर उमेदवारी कापण्यासाठी आग्रह धरला आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्या सहा पैकी केवळ दोनच लोक निवडून आले. त्यामुळे पक्षाचे नुकसान झालं. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. आमच्यात कुठलही भांडण नाही, खासदार यांचा गैरसमज झाला आहे. कुठल्याही नगरसेवकाला कोणाच्याही दरवाज्यात बोलावलं नाही. स्वतःहून नगरसेवक आमच्याकडे आले. हायकमांड येऊन प्रत्यक्ष नगरसेवक त्यांना विचारतील कोण कोणाला घेऊन गेले ते स्पष्ट होईल असेहीतेम्हणाले.

Chandrapur Election 2026 : दोन-चार नगरसेवक सोडले तर सगळेच नगरसेवक माझ्याकडे येतील

दोन-चार नगरसेवक सोडले तर सगळेच नगरसेवक माझ्याकडे येतील. स्वतः खासदार जबरदस्तीने गाडीत बसून घरी घेऊन गेले, हे काही नगरसेवक यांनी मला सांगितलं. एकत्र येऊन चंद्रपूरचा महापौर करायचा आहे. नगरसेवक सोबत बसून निर्णय घेतील. नेत्यांची गरज नाही, पक्ष सोडून जाईल अशी अफवा असल्यानं पक्ष सोडून जाईल अशी चर्चा असते. हा गैरसमज आहे. कार्यकर्ता जिवंत करायला पाहिजे, तरच पक्ष जिवंत आहेत. महानगरपालिकेत 20 सभा घेऊन वार्डात फिरलो. त्यांनीही मेहनत केली. दोघांचा मेहनातीचा निकालाचा परिणाम आहे. असेही त विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: ....तर त्याचा थोबाड कार्यकर्त्यांनी रंगवलं पाहिजे

दिल्लीपर्यंत हा विषय जाण्याची गरज नाही. सगळ्या नगरसेवकांना वन टू वन विचारावे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, नेता पक्षाचा मालक नाही. त्यामुळे नेत्याचं ऐकून न घेता, कोणी मालक समजत असेल तर त्याचा थोबाड कार्यकर्त्यांनी रंगवलं पाहिजे. मालक हे पक्षाचे कार्यकर्ते असतात नेते नाही. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

ही बातमी वाचा: