(Source: ECI | ABP NEWS)
भाई जगतापांचा मनसेला स्पष्ट नकार, पण आता विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या! वर्षा गायकवाडांवरही बोलले
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन भाऊ येत असतील तर त्याला विरोध नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे माविआ आणि काँग्रेसमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रवेशावरूनच गट पडले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Vijay Wadettiwar : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही (Uddhav Thackeray) लढणार नाही, असे मोठं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते नेते भाई जगताप यांनी यांनी केलंय. दरम्यान याच मुद्दयांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत दोन भाऊ येत असतील तर त्याला विरोध नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे माविआ आणि काँग्रेसमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रवेशावरूनच दोन गट पडले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची भूमिका अद्याप आलेली नाही. स्थानिक नेत्यांनी हा निर्णय घ्यावा. इंडिया आघाडी लोकसभा, मविआ विधानसभेसाठी होती. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावर घ्यावी. आम्ही राज ठाकरे (Raj Thackeray)
Vijay Wadettiwar : पण यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल
यांचे स्वागत करतो. राज यांच्या पक्षाला 6 ते 7 टक्के मत मिळतात. भाजपचा चेहरा हा गुजराती चेहरा आहे. त्यामुळे दोन भाऊ येत असतील तर त्याला विरोध नसल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. काँग्रेसचा मुद्दा स्थानिक स्तरावर राहील. राज-उद्धव युतीचा परिणाम हा एमएमआरडीए पुरताच राहील. आमचे ठरले आहे की स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा. पण यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल. हे तीन तिघाडा आणि काम बिघडा असे सरकार आहे. एकत्र बसून सत्तेत बसले आहे. आमच्या बाबतच प्रश्न का उपस्थित का केले जात आहे, असेही ते म्हणाले.
Vijay Wadettiwar on Raj Thackeray : जर तरची भाषा कशाला, राज ठाकरेंकडून प्रस्ताव नाही
आगामी निवडणुका स्थानिक आहेत. मनपा निवडणुकीत स्थानिक प्रश्न घेऊन निवडणूक लढले जाते. एखाद्या पक्षाला आघाडीत घेताना वरिष्ठ निर्णय घेतील. आता केवळ चर्चा आहे, हे अंतिम नाही. आमच्या पक्षाची ग्रामीण पातळीवर इतर पक्षाशी युती होताना दिसेल असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. मात्र सध्या जर तरची भाषा कशाला, ज्यावेळी राज ठाकरेंना घ्यायचे असेल त्यावेळी बोलू. आज राज ठाकरेंकडून प्रस्ताव नाही, एखाद्या पक्षाला आघाडीत घ्याचे असेल तर प्रस्ताव पाहिजे. आज केवळ चर्चा होत आहे. असेही ते म्हणाले.
खैरात म्हणजे दुष्काळात तेरावा महिना
एकीकडे आदिवासी समाज कल्याण, शोषित पीडितांच्या निधी वळवला जात आहे. मागासवर्गीयांच्या निधी वाळवून सत्तेची पोळी शेकायची आणि 50 आमदारांना 5 कोटींचा निधी द्यायचा. कर्ज खूप मोठे झाले आहे. साडे नऊ कोटींच्या घरात राज्यावर कर्ज आले आहे. भाजप महायुती सरकारची हि चाल असून राज्यावर हा अन्याय आहे. ही विरोधकांना विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीने काही मिळणार नाही. ही खैरात जी वाटली जात आहे, माझं स्पष्ट मत आहे दुष्काळात तेरावा महिना असतो तसे आहे. सर्व आमदारांना निधी दिला तर सर्वांगीण विकास होईल, मात्र त्यांची अशी भूमिका नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा

























