Vijay Wadettiwar चंद्रपूर : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना चंद्रपुरात (Chandrapur) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरपीआय (खोरिपा) (Republican Party of India Khobragade) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar NCP) गटाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याचीमाहितीआहे. एकीकडे कालच (रविवारी) शिवसेना उबाठा आणि वंचित यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत युतीची घोषणा केलीय. तरदुसरीकडेयासर्वघडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आरपीआय खोरिपा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत चर्चा केलीय. त्यामुळेयाभेटीमागेनेमकंकारणकाय? आणिपडद्यामागेकाहीवेगळीसमीकरणजुळतअसल्याच्याचर्चाआताराजकीय वर्तुळात केलीजातआहे.
वंचितमध्येच मतभेद असल्यामुळे त्यांच्यासोबत आमची वाटाघाटी फिस्कटली, तर शिवसेना उबाठाने आमच्या सिटिंग जागा मागितल्यामुळे युतीचा विषय संपला, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनिदिलीय. तर राष्ट्रवादी आणि आरपीआय खोरिपासोबत चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच युतीची घोषणा करू, अशी माहितीविजय वडेट्टीवार यांनीदिलीय.
Vijay Wadettiwar : चंद्रपुरातील दोन वारांच्या भांडणात अनेक इच्छुक आमच्याकडे डोकावून पाहतयात
अशातचचंद्रपुरातील दोन वारांच्या भांडणात अनेक इच्छुक आमच्याकडे डोकावून पाहत आहेत. त्या इच्छुकांना आम्ही मेरिटच्या आधारावर उमेदवारी देऊ, अशीप्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदिलीय. भाजप नेते किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या भांडणामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असून काही उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहितीही विजय वडेट्टीवार यांनीयावेळीदिली.
Vijay Wadettiwar on Varsha Gaikwad : मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष यांना विचारूनच ही आघाडी
दरम्यान, मुंबईतकाँग्रेसनेवंचितसोबतकेलेल्यायुतीसंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराजअसल्याचीचर्चाआहे. यावरविजय वडेट्टीवार यांनीप्रतिक्रियादेतानासांगितलंकि, मुंबईचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे. आणि त्यांनी जे ठरवलं आहे त्यातून काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष यांना विचारूनच ही आघाडी झाली आहे, अशी मला माहिती आहे. मुंबईत काँग्रेसच्या काही नेत्यांची काँग्रेसच्या मजबूत जागा वंचितला गेल्याची भावना आहे. मात्र एकदा आघाडी झाल्यानंतर दोन पावलं मागं जावं लागतं, मात्र एकदा आघाडी झाली की सामंजस्याने विजयासाठी पुढे जावं, अशी माझी भावना असल्याचेतेम्हणाले.
Kishor Jorgewar : किशोर जोरगेवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये गडकरींच्याभेटीला
दुसरीकडे, चंद्रपूरमधील वादासंदर्भात किशोर जोरगेवार यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलीय. चंद्रपूर जिल्ह्यात नगर परिषदेमध्ये जरी आमचा पराभव झाला असला, तरी आम्ही महानगरपालिकेमध्ये विजयी होऊ, असे आश्वासन नेत्यांना दिल्याचे जोरगेवार म्हणाले. गेल्या काही दिवसातील चंद्रपूर संदर्भातील माध्यमांमधील बातम्यांमुळे गडकरींसह पक्षश्रेष्ठी चिंतेत होते. मात्र चंद्रपूरमध्ये पक्षाला विजय मिळेल, असे आश्वासन नेत्यांना दिल्याचे किशोर जोरगेवार म्हणाले.
आणखी वाचा
