Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: अभिनेता जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ (Vijay Thalapathy Oath ) घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ दिली. मात्र या शपथविधीवेळी विजय यांच्याकडून राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले. (Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics)
तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी त्यांच्या शपथविधी समारंभादरम्यान भाषण सुरू करून राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉलचे) उल्लंघन केले. जोसेफ विजय शपथ घेतानाच भाषण देऊ लागले. यावेळी विजय यांना थांबवण्यासाठी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी हस्तक्षेप केला. तामिळनाडूला सी. जोसेफ यांच्या रूपाने त्यांचे नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. जेव्हा विजय शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता आणि खुद्द विजयही अत्यंत जोशात दिसत होते. या उत्साहाच्या भरात, त्यांच्याकडून नकळतपणे एक चूक घडली. (Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics)
नेमकं काय घडलं? (Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics)
आपल्या समर्थकांचा उत्साह पाहून विजय क्षणभर ठरलेला राजशिष्टाचार विसरले आणि शपथ घेण्याच्या प्रक्रियेदरम्यानच भाषण सुरू केले. याचवेळी, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी त्यांना थांबवले आणि आधी शपथविधीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विजय यांनी शपथेसाठी ठरवून दिलेल्या विशिष्ट ओळींच्या पलीकडे जाऊन बोलण्यास सुरुवात केली. हस्तक्षेप करत, राज्यपालांनी त्यांना केवळ लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिलेला मजकूरच वाचण्याचे निर्देश दिले. आपली चूक लक्षात येताच, विजय यांनी तात्काळ आपले बोलणे थांबवले.
समारंभापूर्वी, व्यासपीठावर आगमन होताच, राज्यपालांनी विजय यांना शपथ घेण्याच्या योग्य पद्धतीबद्दल माहिती दिली होती. थलपती विजय यांच्या हाती गोपनीयतेच्या शपथेचा मजकूर असलेला एक दस्तऐवज सोपवण्यात आला होता. राज्यपालांनी 'नान' (मी) हा शब्द उच्चारताच, विजय यांनी त्यांचे पूर्ण नाव सी. जोसेफ विजय सांगितले आणि त्यानंतर तामिळ भाषेत भाषण देण्यास सुरुवात केली. या क्षणी, उपस्थितांमधून टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.आपल्या भाषणादरम्यान, विजय यांनी तामिळ भाषेत जनतेला सांगितले की, हा तामिळनाडूचा विजय आहे. यावेळी विजय भावूक झाल्याचे दिसले. त्यानंतर पुढे बोलताना विजय अधिक आक्रमक झाले. नेमक्या याचक्षणी, राज्यपालांनी विजय यांना थांबवले आणि गोपनीयतेची शपथ घेण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, विजय यांनी आपली शपथ पूर्ण केली.
कोण आहेत विजय थलपती? (Who Is Vijay Thalapathy)
विजय थलपती उर्फ जोसेफ विजय यांचा जन्म 22 जून 1974 रोजी झाला. विजय यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि पुढे आघाडीचे सुपरस्टार अभिनेता म्हणून मोठे नाव कमावले. विजय यांच्या अभिनयामुळे आणि जनसामान्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना “थलपती” म्हणून ओळखले जाते. अनेक यशस्वी चित्रपटांमधून त्यांनी सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला. पुढे विजय यांनी राजकारणात प्रवेश करत Tamilaga Vettri Kazhagam या पक्षाची स्थापना केली. जनतेसाठी शिक्षण, रोजगार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. अभिनेता ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास तमिळनाडूमधील तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
तामिळनाडूतील पक्षीय बलाबल - एकूण 234 (Tamilnadu Election Result 2026)
TVK (विजय) - 108DMK - 59AIADMK - 47काँग्रेस - 5PMK - 4मुस्लिम लिग - 2कम्युनिस्ट पक्ष - 2VCK - 2मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 2
