मुंबई : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची (Ahmedabad plane crash) अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. 242 प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अचानक खाली कोसळलं अन् मोठा स्फोट झाला. या स्फोटात विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. आता, या दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay rupani) या विमान प्रवासात होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. मी दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. दुपारी 1:31 वाजता अहमदाबादहून निघालेल्या या विमानात एकूण 242 प्रवासी होते. विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करत होते. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, या अपघातात विजय रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमान प्रवासात होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. मी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
महाराष्ट्रातील प्रवाशांच्या नातेवाईकांना मदतीच्या सूचना
गुजरातमधील विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही लोक आहेत, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. या दुर्घटनेनंतर मी मुख्य सचिवांना फोनवरुन सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील जे नागरिक या विमानातून प्रवास करत होते, त्यांच्या नातेवाईकांना मदत करा असे मुख्य सचिवांना सांगण्यात आल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. या दुर्घटनेची देशाचे पंतप्रधान यांनीही गंभीर दखल घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही गुजरातसाठी रवाना झाल्याची माहितीही शिंदेंनी दिली.
विजय रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू
गुजरात विमान दुर्घटनेत 242 प्रवासी व क्रू मेंबर्स प्रवास करत होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. त्यांच्या नावाचा बोर्डिंग पास आणि त्यांचा विमानातील फोटो याआधी समोर आला होता. या अपघातात विजय रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोण होते विजय रूपाणी?
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील यांगोन येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मायाबेन आणि वडिलांचे नाव रमणिकलाल रूपाणी आहे. सात भावंडांमध्ये विजय रूपाणी हे सर्वांत धाकटे होते. 1960 मध्ये म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतर करून राजकोट येथे स्थायिक झाले. गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या असलेल्या अंजली यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आहे जो इंजिनिअर आहे, तसेच एक मुलगी आहे जिने लग्न केले आहे. त्यांचा दुसरा मुलगा दुर्दैवाने एका कार अपघातात मृत्यूमुखी पडला.
हेही वाचा
मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!
