तामिळनाडू: तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवून देखील चार ते पाच दिवसांच्या बैठका, चर्चा आणि गाठीभेटीनंतर विजय थलपती (TVK Tamil Nadu) यांनी राज्यात सत्ता स्थापन केली, आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर आता तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे, सी. जोसेफ विजय यांचे सरकार कधीही कोसळू शकते. यासोबतच त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. सध्या, यावर 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) च्या नेतृत्वाखालील आघाडीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी डीएमके (DMK) आमदारांनीही दावा केला आहे की, सध्याचे सरकार ६ महिन्यांत कोसळेल.(TVK Tamil Nadu) 

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्टालिन यांनी आपल्या जिल्हा सचिवांना सांगितले आहे की, 'सध्याचे सरकार कधीही कोसळू शकते.' तसेच, 'पक्षाला कधीही निवडणुकीसाठी तयार राहावे लागेल. हा पराभव तात्पुरता आहे. सध्याचे सरकार कधीही पडू शकते. तयार राहा. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही पुन्हा होऊ शकतात, अशी शक्यता आहे. आपण पुनरागमन करू आणि पुन्हा जिंकू', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.(TVK Tamil Nadu) 

CM Vijay TVK Tamil Nadu: डीएमकेला काय अपेक्षा आहे?

सूत्रांच्या माहितीनुसार, जर सरकारला पाठिंबा देणारे व्हीसीके (VCK), सीपीआय (CPI), सीपीएम (CPM) आणि आययूएमएल (IUML) या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेतला, तर राजकीय अस्थिरता येऊ शकते. यासोबतच, जर तामिळनाडूचे स्पीकर किंवा न्यायालयाने एआयएडीएमके (AIADMK) च्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले, तरीही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

CM Vijay TVK Tamil Nadu: सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयाचा दावा

स्टालिन यांनी सोमवारी दावा केला की, टीव्हीकेने कोणतेही काम केलेले नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करून तामिळनाडू विधानसभेसाठी २३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. स्टालिन यांनी पुन्हा टीव्हीकेचे नाव न घेता म्हटले की, मुलांच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांना प्रभावित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला आणि 'हे आमच्या नजरेतून सुटले. डीएमकेला आता याची जाणीव झाली आहे आणि आतापासून पक्ष खूप सतर्क राहील. यासाठी पक्षाने सोशल मीडिया आधारित अशा प्रयत्नांना रोखण्यासाठी योजना आखल्या आहेत. माजी मुख्यमंत्री स्टालिन यांनी पुढे सांगितले की, १९४९ मध्ये स्थापन झालेल्या डीएमकेने अनेक निवडणूक विजय आणि पराभव पाहिले आहेत आणि पक्ष नेहमीच नव्या जोमाने पुनरागमन करत आला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

CM Vijay TVK Tamil Nadu: ३६ सदस्यीय समिती स्थापन

विशेष बाब म्हणजे, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या विश्लेषणासाठी डीएमकेने ३६ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. स्टालिन यांनी या समितीकडून पराभवाच्या कारणांवर एक निष्पक्ष आणि स्पष्ट अहवाल मागवला आहे. त्यांनी शनिवारी समितीच्या सदस्यांना संबोधित करताना स्पष्ट केले की, हा सराव केवळ एक औपचारिकता नसून, पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची मूळ कारणे समजून घेण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. या पॅनेलला तामिळनाडूच्या सर्व २३४ विधानसभा मतदारसंघांमध्ये व्यापक अभ्यास करण्याचे आणि कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून थेट फीडबॅक घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे.