Vijay Chaudhari Audio Clip: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपवरून (Audio Clip) राजकीय वाद शमलेला नसतानाच, आता विजय चौधरी यांची आणखी एक नवी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यापूर्वीच्या क्लिपमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे समोर आले होते. आता समोर आलेल्या नव्या क्लिपमध्ये नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्यातील कथित संभाषण समोर आले आहे.

Continues below advertisement

Vijay Chaudhari Audio Clip: तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख आणि 'बॅक ऑफिस'चा दावा

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख असल्याचे ऐकायला मिळत आहे. या संभाषणात "मॅडम भाजपचे कार्यालय मागून चालवत असल्याचे सांगत होत्या, मी मॅडमला भेटून आलो," असा खळबळजनक दावा विजय चौधरी तत्कालीन पोलीस अधीक्षकांशी बोलताना करत आहेत. तसेच संबंधित महिला अधिकारी निवृत्तीनंतर भाजपच्या खासदार बनतील, अशी चर्चाही या संभाषणात झाल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी एबीपी माझा करत नाही.

Vijay Chaudhari Audio Clip: कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण

 तत्कालीन पोलीस अधीक्षक :- न्यायालयाने नोटीस काढली आहे.

Continues below advertisement

विजय चौधरी :- हा, हा... न्यायालयाने नोटीस काढली होती. त्याच्यात एक केस सुरू होती, नगरपालिकेच्या अंतर्गत वादाची.

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- हो, त्याच्यात कोर्टाने एक दिवसासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

विजय चौधरी :- हो, एक दिवसासाठी आहे. पण ते होऊन जाणार.

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- हो, मला तेच सांगायचं होतं आपल्याला.

विजय चौधरी :- जी, जी सर.

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- कारण मला पत्रकार फोन करून विचारत होते त्यांच्याबद्दल, त्यांना अटक केली आहे का?

विजय चौधरी :- जी, जी.

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- अटक नाही केली. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे. न्यायालयात हजर झाले होते. तुम्हाला माहिती आहे का नाही, त्यासाठी फोन केला होता...

विजय चौधरी :- हो, मला लगेच फोन आला होता. त्याचाही फोन आला होता आणि वकिलांचेही फोन आले होते. त्यावेळेस मी मीटिंगमध्ये होतो. आमच्या प्रदेश कार्यकारिणीत बावनकुळे आणि मी होतो. त्यांच्यासाठी वकिलांनी न्यायाधीशांचीही विनंती केली. ठीक आहे, उद्यापर्यंत करून देतो.

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- आता ते रुग्णालयात गेले आहेत.

विजय चौधरी :- हो, बरोबर. हॉस्पिटलला आहेत.

विजय चौधरी :- और सर... ये हुआ के नहीं...

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- क्लिअर हुआ क्या नहीं...

विजय चौधरी :- हो गया. आपके मॅडम के पास बैठा था आधे घंटे पहले... कुछ नहीं, मैं आपके बीजेपी का बॅक ऑफिस चला रही हूँ, ऐसे बोल रही थी. फिर मैंने बोला, आप रिटायरमेंट के बाद बीजेपी के सांसद बनेंगी. हँस रही थी वो भी... फिर...

तत्कालीन पोलीस अधीक्षक :- अरे, हुआ कि नहीं...

विजय चौधरी :- हो गया. हम डटे रहे. क्या था, उनको भी चाहिए था. (शिंदे) मेरे सांसद हैं, मुझे दो साल और दो, फलाना-फलाना है. हमारे बीजेपी में कुछ लोग होते हैं ना, वो भी निगेटिव थे. इनको दिया तो मराठा और दलित समाज खिलाफ जाएंगे. फिर भी हम 'डी. एफ' साहब की ताकत के साथ हटकर खड़े रहे. मैंने तो नंदुरबार में भी एक बोर्ड लगाया...

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Girish Mahajan and Vijay Chaudhari: एकनाथ खडसे, रक्षा खडसेंविषयी शिवराळ भाषेचा वापर, गिरीश महाजन अन् भाजपच्या विजय चौधरींची ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ