मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) 17 जागांसाठी निवडणुकांची (Election) घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना याही निवडणुकीत होत आहे. त्यासाठी, महायुतीमध्ये 12-5-2 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यामध्ये, भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात अंतिम निर्णय झाला नसून तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत. मात्र, भाजपने 12 जागांसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारांच्या नावांची यादीही निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) आज 48 नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना होत आहेत. 

Continues below advertisement

विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला असून पुढील 2 ते 3 दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यासाठी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होत आहेत. विधान परिषदेच्या एकूण 12 जागांसाठी 48 जणांच्या नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन रविंद्र चव्हाण नावांसंदर्भात चर्चा कर आहेत. 

2-3 दिवसांत नावे जाहीर होणार

विधानपरिषद निवडणुकांचा महायुतीमधील फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे व इतर बाबींची तपशीलवार माहिती केंद्रीय पक्ष नेतृत्वाला दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, चव्हाण यांच्या दिल्ली दौऱ्यातच भाजपच्या 12 उमेदवरांची नावे निश्चित केली जाणार असून पुढील 2 ते 3 दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जून पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे, 2-3 दिवसांत नावे निश्चित करुन उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेशही पक्षाकडून दिले जातील. 

Continues below advertisement

विधानपरिषदेच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचा संताप

विधानपरिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी एकनाथ शिंदेंची अनेकदा चर्चा झाली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करूनही विधान परिषदेच्या निवडणुकीवर तोडगा निघत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच की काय आज एकनाथ शिंदे हे पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या जागांवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. कुठलं बोलणार... काय आहे? असं म्हणत त्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर आले खरे, परंतु त्यांना पहिलाच प्रश्न विधान परिषदेच्या बैठकीबाबत केल्याने ते पत्रकारांवर प्रचंड संतापले. त्यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केला. त्यांची बदललेली देहबोली पाहता, चर्चांना उधाण आलं. त्यामुळं या बैठकीत नेमकं काय घडलं, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

हेही वाचा