Vidhanparishad Election 2026 Shivsena: येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात रंगत आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान संपल्यानंतर राजकीय वर्तुळाचे सर्व लक्ष विधानपरिषद निवडणुकीवर (Vidhan Parishad Election 2026) केंद्रित झाले आहे. या निवडणुकीच्यादृष्टीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) सध्या वेगवान हालचाली सुरु आहेत. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उमेदवार म्हणून विधापरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची नावे अंतिम केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. (Maharashtra Politics news)

विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ हे 57 असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, या दोन जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते इच्छूक असून त्यामुळे आता नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्याच नावाला पक्षातून मोठ्याप्रमाणात विरोध सुरु झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीलम गोऱ्हे यांच्या नावाला शिवसेनेतील काही मंत्री आणि नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभेत ज्याप्रमाणे ज्योती वाघमारे यांच्या रुपाने नवा चेहरा देण्यात आला, तोच निकष विधानपरिषद निवडणुकीत वापरावा, अशी पक्षातील काही नेत्यांची मागणी आहे. तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय, असा सवाल अनेक नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी द्यायचीच असेल तर त्यांच्यासमोर एक अट ठेवावी. बच्चू कडू यांना त्यांची प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करण्यास सांगावे, असा प्रस्ताव शिवसेनेतील काही नेत्यांनी मांडला आहे. यावर दोन्ही बाजूने पुढे कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कळते. मात्र, नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोन्ही नावांना शिवसेनेतून प्रचंड विरोध असल्याचे कळते. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शिवसेना विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार, हे समोर येईल.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026मतदानाची तारीख: 12 मे 2026मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजतानिवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

आणखी वाचा

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त एक जागा, पण 6 जण रेसमध्ये, कोणाकोणाची नावं चर्चेत?

महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषदेसाठी 30 नावं केंद्रीय भाजपकडे, केशव उपाध्ये ते रवी अनासपुरेंच्या नावाचा समावेश, राष्ट्रवादीकडून लढलेल्या नेत्याचं नाव यादीत