Vidhan Parishad New Member Oath Ceremony: विधान परिषदेवर (Vidhan Parishad New Member Oath Ceremony) विधानसभा सदस्यांद्वारे द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात आज शपथविधी सोहळा पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेच्या या नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.

Continues below advertisement

भाजपचे प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, शिवसेनेच्या (शिंदे) डॉ. नीलम गोऱ्हे व बच्चू कडू, शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे झिशान सिद्दिकी यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते. 

कोणत्या पक्षाकडून कुणी शपथ घेतली?, संपूर्ण यादी- (Vidhan Parishad New Member Oath Ceremony)

  1. प्रमोद जठार- भाजप
  2. सुनील कर्जतकर- भाजप
  3. माधवी नाईक- भाजप
  4. संजय भेंडे- भाजप
  5. विवेक कोल्हे- भाजप
  6. प्रज्ञा सातव- भाजप
  7. डॉ. नीलम गोऱ्हे- शिवसेना शिंदे गट
  8. बच्चू कडू- शिवसेना शिंदे गट
  9. झिशान सिद्दिकी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
  10. अंबादास दानवे- शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली होती. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार होती. 12 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु 10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपच्या 6, शिवसेना शिंदे गटाच्या 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आणि शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी) च्या एका उमेदवाराचा समावेश आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्र विधान परिषदेची (Vidhan Parishad) एकूण सदस्यसंख्या 78 आहे. विधान परिषदेत सदस्य कसे निवडले जातात? (Vidhan Parishad )

78 सदस्यांपैकी:

  • 30 - आमदारांकडून निवडले जातात
  • 22- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून
  • 7- पदवीधर मतदारसंघातून
  • 7-  शिक्षक मतदारसंघातून
  • 12- राज्यपाल नियुक्त करतात.

विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)

  • भाजपा- 132 - 1 = 131
  • शिवसेना (शिंदे गट)- 57
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
  • काँग्रेस- 16
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
  • शिवसेना (ठाकरे गट)- 20
  • समाजवादी पार्टी- 2
  • जनसुराज्य शक्ती- 2
  • राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
  • एमआयएम- 1 जागा
  • सीपीआय (एम)- 1
  • पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
  • राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
  • अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)       
  • महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
  • मविआ = 16+10+20+2+1 = 49
  • इतर = 03 
  • एकूण = 286 आमदार

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; कोणत्या पक्षाकडून कोण आमदार होणार?, A टू Z माहिती