Vidhan Parishad MLA Attandance:महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची (Vidhan Parishad MLA Attandance) आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. अशातचराज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गेल्या चार वर्षांत केवळ 31.58 टक्के उपस्थिती नोंदवली आहे. तर काही सदस्यांनी सलग तीन अधिवेशनांमध्ये एकदाही हजेरी लावलेली नसल्याचेसमोरआलंआहे. या उलट, काही सदस्यांनी 90 टक्क्यांहून अधिक उपस्थिती राखत आदर्श कामगिरी केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषदेतील कामकाजात सदस्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते. मात्रयासगळ्यातचर्चाआहेती विधान परिषदेमध्ये सर्वाधिक उपस्थित राहणाऱ्या सदस्यापैकी शंभर टक्के उपस्थिती नोंदवलेल्याआमदाराची.
Vidhan Parishad MLA Attandance: अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
जालन्यातील काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी 18 पैकी 13 अधिवेशनात हजेरीलावत शंभर टक्के उपस्थिती नोंदवलीय. दरम्यान, आमदारकीची शपथ घेतानाच मी शंभर टक्के उपस्थित राहण्याचा संकल्प केला होता, या काळात उपस्थित राहून जास्त प्रश्न मांडण्याची संधी आपल्याला मिळाली असून, या काळात साडेअकराशे पेक्षा आपण जास्त प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे इतर सदस्यांनी देखील मोठ्या संख्येने सातत्याने उपस्थित राहिलं पाहिजे, असा आग्रह देखील राजेश राठोड यांनी बोलतानाव्यक्त केला आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची उपस्थिती किती?
दरम्यान, 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण 133 बैठकींपैकी केवळ 42 बैठकींना हजेरी लावली. म्हणजेच त्यांची उपस्थिती केवळ 31.58 टक्के इतकी राहिली. उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. या काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाही. मात्र, 2022 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती लावली. 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही 16 पैकी केवळ 4 बैठकींना ते उपस्थित होते.
Vidhan Parishad : 3 अधिवेशनांना पूर्ण दांडी
दरम्यान, उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सलग तीन अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती दर्शवली नाही.
यांची सर्वाधिक उपस्थिती
विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी सहा वर्षांतील 18 पैकी 13 अधिवेशनांत 100 टक्के उपस्थिती नोंदवली. शशिकांत शिंदे यांनी 18 पैकी 11 अधिवेशनांत पूर्ण उपस्थिती राखली.
सध्याच्या सदस्यांमध्येही उल्लेखनीय कामगिरी
सध्याच्या सदस्यांमध्ये मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि सुधाकर आडबाले यांनी अनेक अधिवेशनांत 100 टक्के उपस्थिती नोंदवत लक्ष वेधले आहे.
Ramraje Naik Nimbalkar: प्रकृती ठीक नसल्याचे विधान परिषद कार्यालयाला कळवलं
सलग तीन अधिवेशनांना पूर्ण दांडी असल्याचे आकडेवारी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे विधान परिषद कार्यालयाला कळवलं असल्याची माहिती दिली. तब्येत बिघडली असल्याने मी अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो नाही. असा पत्र व्यवहार देखील केला होता. तब्येत ठीक नसल्याने रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकलो नाही अशी माहिती एबीपी माझाला फोनवरून दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
