Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026) जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपने 11, शिवसेनेने 4 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर निवडणूक लढवली होती. 

Continues below advertisement

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला- (Vidhan Parishad Election Result 2026)

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला. तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली. राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर  एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला. भाजप, 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे. दरम्यान, स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या पन्नास टक्के अधिक एक मत, असा 'विजयाचा कोटा' निश्चित केला जातो. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत हा कोटा पूर्ण न झाल्यास, दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. 

महाराष्ट्र विधान परिषद - 17 जागांचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026)
     
अ.क्र.मतदारसंघ (जिल्हा)विजयी उमेदवारपक्षनिकाल
1ठाणेरवींद्र फाटकशिवसेनाबिनविरोध विजयी
2यवतमाळदुष्यंत चतुर्वेदीशिवसेनाबिनविरोध विजयी
3रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्गअनिकेत तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसबिनविरोध विजयी
4पुणेविक्रम काकडेराष्ट्रवादी काँग्रेसबिनविरोध विजयी
5वर्धा - गडचिरोली - चंद्रपूरअरुण लखाणीभाजपबिनविरोध विजयी
6अहिल्यानगरप्राजक्त तनपुरेभाजपबिनविरोध विजयी
7छत्रपती संभाजीनगर - जालनासुहास शिरसाटभाजपविजयी
8नाशिकगोकुळ गितेअपक्ष (भाजप बंडखोर)विजयी
9भंडारा - गोंदियाअविनाश ब्राह्मणकरभाजपविजयी
10सांगली - साताराधैर्यशील कदमभाजपविजयी
11परभणी - हिंगोलीसईद खानशिवसेनाविजयी
12सोलापूरराजेंद्र राऊतभाजपविजयी
13धाराशिव - लातूर - बीडबसवराज पाटीलभाजपविजयी
14नागपूरराजीव पोतदारभाजपविजयी
15जळगावनंदकिशोर महाजनभाजपविजयी
16अमरावतीप्रवीण पोटेभाजपविजयी
17नांदेडअमर राजूरकरभाजपविजयी

कुठे किती टक्के मतदान झाले? (Vidhan Parishad Election 2026 Result) 

Continues below advertisement

राज्यात कुठल्या मतदारसंघात कुणाची किती ताकद होती?- (Vidhan Parishad Election Result 2026)

ठाणेएकूण मते - ९९७भाजप - ४३१शिवसेना - ३०९राष्ट्रवादी - १८

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग-एकूण मते - ८२३भाजप - २४१शिवसेना - २७५राष्ट्रवादी - १४९

अहिल्यानगर -एकूण मते - ४५२भाजप - २०७शिवसेना - ४४राष्ट्रवादी - ६४

जळगाव -एकूण मते - ६६७भाजप - २७४शिवसेना - २०८राष्ट्रवादी - ५५

नाशिक -एकूण मते - ६०३भाजप - १८६शिवसेना - १६१ राष्ट्रवादी - १०७

सोलापूर -एकूण मते - ६१७भाजप - ३०४शिवसेना - ७६राष्ट्रवादी - ४८

सांगली सातारा-एकूण मते - ८९८भाजप - ३७१शिवसेना - ११०राष्ट्रवादी - १४५

पुणे -एकूण मते - ८७८भाजप - ३३५शिवसेना - ८२राष्ट्रवादी - ३७५

यवतमाळ -एकूण मते - ४४६भाजप - १३५शिवसेना - १०४राष्ट्रवादी - २९

भंडारा गोंदिया -एकूण मते - ४३६भाजप - १९६शिवसेना - १५राष्ट्रवादी - ८३

वर्धा चंद्रपूर गोंदिया-एकूण मते - २६४भाजप - १४९शिवसेना - १राष्ट्रवादी - १५

अमरावती -एकूण मते - ४४९भाजप - १३६शिवसेना - २३राष्ट्रवादी - ८३

धाराशिव लातूर बीड-एकूण मते - ९०४भाजप - ३७९शिवसेना - ८०राष्ट्रवादी - २०२

परभणी हिंगोली -एकूण मते - ४७३भाजप - १११शिवसेना - ७४राष्ट्रवादी - १२३

छत्रपती संभाजी नगर - जालना-एकूण मते - ६४६भाजप - २५४शिवसेना - १३९राष्ट्रवादी - ८६

नागपूर -एकूण मते - ७९४भाजप - ५०१शिवसेना - ३०राष्ट्रवादी - ५

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकलांचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, नाशिक विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!