Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Gite Nashik: नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad E;ection Result 2026) अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नाशिक विधान परिषदेतील विजयानंतर गोकुळ गीते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडणुकीतून माघार कधीच घेतली नव्हती. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर प्रचार थांबवला होता, परंतु मी घरात बसलेलो असताना माझ्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी गुप्त प्रचार केला, असं गोकुळ गीतेंनी सांगितले. तसेच शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. लोकांची स्वत:ची वैचारिक मतं असतात. नरेंद्र दराडेंनी विश्वास गमावला म्हणून गोकुळ गिते आमदार झाले. माझ्या यशात मीडियाचा मोठा सहभाग होता, असंही गोकुळ गीते म्हणाले. तसेच निवडणूक कार्यकर्त्यांनी पुढे नेऊन ठेवली होती. हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. एकनाथ शिदेंनी तुम्हाला मुंबई बोलावले असून त्यासाठी नाशिकमध्ये विमान पाठवले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मी विमानात बसलो, तरी माझे पाय जमिनीवरच राहतील, असंही गोकुळ गीतेंनी सांगितलं.
महाविकास आघाडी आणि इस्लाम पार्टीचे आभार- गोकुळ गीते (Gokul Gite Vidhan Parishad Election 2026)
मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझा विजय त्यांना समर्पित करतो मी घरात बसलेलो असताना माझ्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी गुप्त प्रचार केला. नाशिकमध्ये निष्क्रिय उमेदवार दिलेला होता. महायुतीच्या नेत्यांच्या शब्दाला मी मान दिला आणि प्रचार थांबवलेला होता. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवलं. त्यासाठी मी माफी मागतो, असं गोकुळ गीतेंनी स्पष्ट केलं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी, इस्लाम पार्टीने मदत केली. त्यांचे आभार मानतो. एकनाथ शिंदेंना भेटण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा असल्यास माझ्या कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेईन, असं गोकुळ गीते म्हणाले.
अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना तब्बल 357 मते- (Gokul Gite Nashik Vidhan Parishad Election Result 2026)
नाशिक विधान परिषदेसाठी एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील 13 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मते मिळवता आली. दुसऱ्या बाजूला, निवडणुकीच्या रिंगणात असलेले आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 303 चा कोटा पार केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. (Gokul Gite Nashik Vidhan Parishad Election Result 2026)
नाशिक अंतिम निकाल- (Nashik Vidhan Parishad Election Result 2026)
- नाशिक एकूण मतदान - 618
- अवैध मतदान - 13
- वैध मतदान - 605
- फायनल कोटा - 303
- अपक्ष, गोकुळ गीते - 357
- शिवसेना, नरेंद्र दराडे - 248
निकाल- गोकुळ गीते विजयी
विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल- (Vidhan Parishad Election Result 2026 Winner List)
- ठाणे - रवींद्र फाटक - शिवसेना, (बिनविरोध)
- यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी - शिवसेना, (बिनविरोध)
- रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- पुणे - विक्रम काकडे - राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- वर्धा - गडचिरोली - चंद्रपूर - अरुण लखाणी - भाजप, (बिनविरोध)
- अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे - भाजप, (बिनविरोध)
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
- नाशिक- गोकुळ गीते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
- भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
- सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
- परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
- सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
- धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
- नागपूर- राजीव पोतदार, भाजप
- जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
- अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
- नांदेड- अमर राजूरकर, भाजप
